S M L

घटकपक्ष भाजपसोबतच, काळजीचं कारण नाही - मुख्यमंत्री

Sachin Salve | Updated On: Mar 8, 2016 11:02 PM IST

मुंबई - 08 मार्च : घटक पक्ष आमच्यासोबतच आहे. काळजीचं कारण नाही असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. महायुतीचे नेते ज्या कार्यक्रमाला गेले तो कार्यक्रम राष्ट्रवादीचा नव्हता असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

cm devendra fadanvis4पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर सत्ताधारी घटक पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. सदाभाऊ खोत, महादेव जानकर आणि विनायक मेटे यांनी या कार्यक्रमात जाहीरपणे आपली नाराजी उघड केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या सर्व घटक पक्षांची तातडीने बैठकही बोलावली. परंत, त्यापूर्वी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत घटक पक्ष आपल्यासोबत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. मुळात तो राष्ट्रवादीचा कार्यक्रम नव्हता. त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला गेले नाही. आणि ज्या कार्यक्रमाला गेले होते तिथे जाण्याच्या आधी आणि नंतरही ते आमच्याशी बोलले होते असा खुलासाही मुख्यमंत्र्यांनी केला. महायुतीचे नेत्यांनी त्या कार्यक्रमात राष्ट्रवादीवरही टीका केली होती पण ती मीडियाने दाखवली नाही अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 8, 2016 11:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close