S M L

मुख्यमंत्र्यांकडून सेनेसह घटकपक्षांच्या दिलजमाईचा प्रयत्न

Sachin Salve | Updated On: Mar 9, 2016 08:11 PM IST

cm_devendra_phadanvis4मुंबई - 09 मार्च : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जरी 'एकला चलो रे'चा राग आळवला असला तरी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटकपक्षांच्या बैठकीत दिलजमाई करण्याचा प्रयत्न केलाय. उद्धव ठाकरे यांना देखील या बैठकीला आमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीत घटकपक्षातील महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत उपस्थित होते.

राज्यात दुष्काळाच्या मुद्यावर शिवसेना आक्रमक आहे. हाच आक्रमकपणा विधिमंडळात भाजपाला अडचणीचा ठरतो. अशा परिस्थितीत शिवसेने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधीपक्षाची भूमिकेत जाऊ नये अशी मुख्यमंत्र्यांची अपेक्षा आहे. या अधिवेशनात शिवसेना आमदारांनी भाजप मंत्र्यांच्या विरोधात आक्रमण करू नये. त्याचबरोबर जिल्ह्या जिल्ह्यातले संघर्ष मिटवावे याबाबत चर्चा करण्यात आली.

गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यातला संघर्ष मिटवण्यासाठी नेत्यांशी वैयक्तीक चर्चा झाली. तसंच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यातील संघर्ष मिटवण्यासाठी नेत्यांशी वैयक्तिक चर्चा केली. तसंच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या मुद्यावर भाजपाबरोबर चर्चा झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 9, 2016 08:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close