S M L

शारापोव्हाकडे जाहिरातदारांनीही फिरवली पाठ

Sachin Salve | Updated On: Mar 9, 2016 11:01 PM IST

शारापोव्हाकडे जाहिरातदारांनीही फिरवली पाठ

09 मार्च : टेनिसस्टार मारिया शारापोव्हावर बॅन केलेल्या औषधंाच्या सेवनामुळे टेनिस खेळण्यावर तात्पुरता बंदी घालण्यात आली आहे. तसंच तिनं आपल्यावर झालेले आरोपाची कबुलीही दिलीये. तिच्यावरच्या या कारवाईमुळे जाहिरातदारांनी आता पाठ फिरवली आहे.

शारापोव्हा ऑस्ट्रेलियन ओपन दरम्यान ड्रग्स टेस्टमध्ये फेल झालेली. निषिध्द असलेलं औषध 10 वर्ष घेत असल्यामुळे शारापोव्हावर ही कारवाई करण्यात आली. मेलडोनियम नावाचा पदार्थ शारापोव्हानं औषध म्हणून घेतलेला. ह्या सर्व गोष्टींचा उलगडा होताच नाइकी,टॅग आयर आणि पोर्शे कार या ब्रँडसने आपले करार रद्द केले आहेत.

शारापोव्हाच्या रक्तात ड्रग्सचा अंश आढळल्याने तिच्यावर ही कारवाई झाली आहे. शारापोव्हा मेलोडिअम नावाचं औषधं गेल्या 10 वर्षांपासून प्रकृतींच्या तक्रारीमुळे घेतेय. 'मला माहित नव्हतं यावर बंदी आहे, नाहीतर मी हा पदार्थ घेतला नसता' पण याची ती संपूर्ण जबाबदाही स्वीकारते असं शारापोव्हाने स्पष्टपणे कबूल केलं. तसंच ती चार वर्षांची असल्यापासून टेनिस खेळतेय,आणि टेनिसची कारकीर्द तिला अशाप्रकारे संपवायची नाहीये म्हणून तिला आणखी एक संधी मिळावी असाही सूर आहे. शारापोव्हाला सध्या एक वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त काळ बंदी असेल,असं म्हटलं जातंय.

दरम्यान, सेरेना विलियम्सनं शारापोव्हाला पाठिंबा दर्शवलाय. मी हे औषध घेतलं हे स्वतःहून सांगायला खूप धाडस लागतं. शारापोव्हाने नेहमीच धाडस दाखवलंय असं सेरेनाचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 9, 2016 06:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close