S M L

उद्धवसाहेब, हे पण पाहा, 'मातोश्री'जवळच शिवसैनिक भिडले

Sachin Salve | Updated On: Mar 10, 2016 05:23 PM IST

उद्धवसाहेब, हे पण पाहा, 'मातोश्री'जवळच शिवसैनिक भिडले

मुंबई - 10 मार्च : "तुम्हाला मारहाण करणारे शिवसैनिक दिसता पण चांगले काम करणारे शिवसैनिक दिसतं नाही" अशी तीव्र नाराजी व्यक्त केली होती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी. पण आज मुंबईत 'मातोश्री'जवळील शिवसेनेच्या शाखेत शिवसैनिक भिडले. शाखेच्या वर्चस्वावरुन शिवसैनिकांनी एकमेकांना मारहाण केली. या मारहाणीत शिवसेनेचे शाखाप्रमुख बबन साळवी जखमी झाले आहे.

बबन साळवी हे वांद्रे पूर्व येथील मातोश्री जवळील शिवसेनेची शाखा क्रमांक 89 चे शाखाप्रमुख आहे. या परिसरात एकेकाळचे नारायण राणे यांचं कट्टरसमर्थक समजल्या जाणारे श्रीकांत सरमळकर कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांपासून शाखेच्या वर्चस्वावरुन दोन्ही नेत्यांमध्ये वाद सुरू होता. आज या प्रकरणाला हिंसक वळण मिळाले.

श्रीकांत सरमळकर यांचे समर्थक हरी शास्त्री यांनी आपल्या 12 कार्यकर्त्यांसह बबन साळवी यांच्यावर हल्ला केला. सेनेच्या शाखेमध्ये घुसून बबन साळवी यांना मारहाण करण्यात आलीये. उपस्थिती असलेल्या साळवी यांच्या समर्थकांनीही हरी शास्त्री यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. या मारहाणीत बबन साळवी जखमी झाले आहे. विशेष म्हणजे, हरी शास्त्री हे श्रीकांत सरमळकरांचे जावई आहेत. आणि श्रीकांत सरमळकर शिवसेनेचे माजी उपनेते आहेत.

काही दिवसांपूर्वी ठाण्यात एका महिला वाहतूक पोलिसाला शशिकांत कालगुडे या वाहनचालकाने मारहाण केली होती. कालगुडे हा माजी शिवसेनेचा शाखाप्रमुख असल्याचं समोर आलं होतं. परंतु, तो शिवसैनिक नाही असं शिवसेनेनं स्पष्ट केलं होतं. या प्रकरणावरुन उद्धव ठाकरे यांनी मीडियाला मारहाण करणारे शिवसैनिक दिसता पण चांगले काम करणारे शिवसैनिक दिसत नाही अशी नाराजी व्यक्त केली होती. आज त्यांच्याच घराजवळ शिवसैनिकांनी राडा घातलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 10, 2016 05:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close