S M L

आयफोनसाठी त्यांनी 18 दिवसांच्या बाळाला विकलं !

Sachin Salve | Updated On: Mar 10, 2016 06:24 PM IST

आयफोनसाठी त्यांनी 18 दिवसांच्या बाळाला विकलं !

चीन - 10 मार्च : बिजिंगमध्ये एका दाम्पत्याने आयफोन खरेदी करण्यासाठी आपल्या नवजात 18 दिवसांच्या मुलीला 3530(अमेरिकन डॉलर) ला विकल्याची धक्कादायक घटना घडलीये. अे ड्युआन हे मुलीच्या वडिलांचे नाव असून बाळाला विकत घेणारा त्यांना सोशल साईटवर भेटला आणि त्यानं मागितलेली किंमतही दिली.

अे ड्युआनला आयफोन आणि बाईक खरेदी करायची होती. तो आणि त्याची पत्नी हे पार्ट टाईम जॉब करतात. त्यामुळे आर्थिक अडचणींना

सामोरं जावं लागत होतं. तसंच पतीपत्नी 19 वर्षांचे असल्याने नको असलेल्या गर्भधारणेतून मुलीचा जन्म झाला आणि दाम्पत्याने मुलीला विकण्याचा निर्णय घेतला. पैशाच्या अभावामुळे दाम्पत्याला मुलीला सांभाळणं कठीण झालं, तसंच बाकीच्या गरजा भागवणंही कठीण झालेल.

मुलीच्या आईने,'मी स्वत: दत्तक अपत्य आहे आणि आमच्या घरात या आधीही मुलांची विक्री केली होती, मला माहित नव्हतं की, हे बेकायदेशीर आहे' असंही म्हटलंय. मुलीला विकल्यानंतर या दाम्पत्याने घरातून पळ काढला. पण पोलिसांनी मुलीच्या बेकायदेशीर विक्रीच्या आरोपात या दोघांना ताब्यात घेतलंय आणि कोर्टाने 3 वर्षं कारागृहाची शिक्षाही ठोठावली आहे.

चीनमध्ये दरवर्षी किमान 2,00,000 मुलं आणि मुलींचं अपहरण होतं आणि त्यांना खुलेआम त्यांची विक्रीही होते. त्यामुळे पोलीस ह्या बाबत दक्षता घेण्यास सांगत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 10, 2016 06:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close