S M L

विंदांना अखेरचा निरोप

15 मार्च'देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे...' अशी जीवनाची उदात्त शिकवण देणारे, ख्यातनाम कवी गोविंद विनायक उर्फ विंदा करंदीकर यांना आज अखेरचा निरोप दिला गेला.मुंबईत साहित्य सहवासमध्ये विंदांना सरकारी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. 21 बंदुकींच्या फैरींची सलामी त्यांना देण्यात आली. विंदांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले. विंदांचे मुंबईतील वांद्रे येथील गुरु नानक हॉस्पिटलमध्ये रविवारी सकाळी पावणे दहा वाजता निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.साहित्य सहवासमधील फुलराणी सभागृहात विंदांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दुपारी 3 वाजेपर्यंत ठेवण्यात आले आहे. विंदांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान होणार आहे. विंदाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी विंदांची मित्रमंडळी, साहित्यिक, नातेवाईक उपस्थित झाले आहेत. दरम्यान साहित्य सहवासमध्ये विंदांना 21 बंदुकींच्या फैरींची सलामी देण्यात आलीमुख्यमंत्री अशोक चव्हाण, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विंदांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. तसेच विंदांच्या असंख्य चाहत्यांनीही लाडक्या विंदांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. गेले महिनाभर विंदा आजारी होते. त्यापूर्वीही ते एकदा हॉस्पिटलमध्ये राहून घरी परतले होते. 15 दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुन्हा घराजवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉ. शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही दिवस आयसीयूत ठेवून त्यांना नंतर घरी घेऊन जाण्याचा विचार होता. शनिवारी विंदांची प्रकृती उत्तम असल्याने त्यांना रविवारी घरी नेण्याचे ठरले होते. पण रात्री साडे अकराच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. सकाळी त्यांची प्रकृती खालावत गेली आणि पावणेदहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. विंदांच्या इच्छेनुसार त्यांच्या पत्नी सुमा यांच्याप्रमाणेच त्यांचा मृतदेह जे. जे. हॉस्पिटलला दान करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी विंदांचे नेत्र दान करण्यात आले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2010 03:12 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2010 03:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close