S M L

मुख्यमंत्र्यांनी मागितली अण्णांची माफी !

Sachin Salve | Updated On: Mar 10, 2016 07:17 PM IST

मुख्यमंत्र्यांनी मागितली अण्णांची माफी !

10 मार्च : काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी सुरक्षेच्या मुद्दयावर नाराजी व्यक्त केली होती. याच मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांची माफी मागितली आहे. सुरक्षेतल्या त्रुटीमुळे मी अण्णांची क्षमा मागतो, आपल्या पत्राची गांभीर्याने दखल घेत असून उणीवा दूर करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय.

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पाहणीत सुरक्षारक्षक मोबाईलवर व्यस्त असल्याचं आढळून आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे सुरक्षेत हलगर्जी करणार्‍यांवर कठोर कारवाईचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. त्याचबरोबर प्रवासात एक वाहन, सुरक्षा रक्षकासह बरोबर असतील आणि स्थानिक पोलीस अधिकारी सुरक्षेचा आढावा घेईल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय तर तर सुरक्षा मागं न घेता ती कायम ठेवण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 10, 2016 07:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close