S M L

आम्ही आग विझवणारे, उद्धव ठाकरेंचा राजना टोला

Sachin Salve | Updated On: Mar 11, 2016 07:40 PM IST

raj Uddhavमुंबई - 11 मार्च : रिक्षा जाळून टाका असं चिथावणीखोर वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं. त्याला 'आम्ही आग विझवणारे आहोत' अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता कोपरखळी दिली.

70 हजार रिक्षा परवाने वाटप केलं जाणार आहे. पण, यामध्ये 70 टक्के परप्रांतियांना परवाने दिले जाणार आहे असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला होता. तसंच या रिक्षा जर मुंबईच्या रस्त्यावर दिसल्या तर त्या पेटवून द्या असा आदेशही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावर सर्वच राजकीय पक्षांनी सडकून टीका केलीये. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज यांच्या वक्तव्याचा आपल्या शैलीच समाचार घेतलाय. अग्निशमन दलाच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी बोलतांना, उद्धव ठाकरेंनी राज यांनी कोपरखळी दिलीये.'हा आग विझवण्याचा कार्यक्रम आहे आणि आम्ही आग विझवणारे आहोत' अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 11, 2016 07:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close