S M L

मराठवाडा विद्यापीठात विभागप्रमुखांवर प्राध्यापकाचा हल्ला

Sachin Salve | Updated On: Mar 11, 2016 08:57 PM IST

मराठवाडा विद्यापीठात विभागप्रमुखांवर प्राध्यापकाचा हल्ला

औरंगाबाद - 11 मार्च : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गोंधळाचं माहेरघर झालं आहे. पीएचडीचा काळाबाजार आयबीएन लोकमतनं नुकताच जगासमोर आणला. आता केमिकल तंत्रज्ञान विभागात विभाग प्रमुखांवर त्यांच्याच सहाय्यक प्राध्यापकानं हल्ला केल्याचं प्रकऱण समोर आलंय. या हल्ल्यात विभागप्रमुख प्रविण वक्ते जबर जखमी झाले आहे.

विभागप्रमुख प्रविण वक्ते यांच्यावर त्यांचेच सहाय्यक प्राध्यापक गौरशेटे यांनी हल्ला केला आहे. या प्रकरणी कुलगुरू बी.ए.चोपडा यांनी मारणारे आणि मार खाणारे दोघांनाही प्रसारमाध्यामांना न बोलण्याची तंबी दिली आहे. आणि यावर कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे या प्रकरणावर बोलण्यास तयार नाहीत. एकंदरीत पीएचडी प्रकरण आणि आता मारामारी प्रकऱणी कारवाई होत नाही म्हणून कुलगुरूच चर्चेचा मुद्दा ठरले आहे. विद्यार्थ्यांनी झाल्या प्रकरणी विभाग बंद पाडलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 11, 2016 08:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close