S M L

मुंबईमध्ये मराठी टक्का टिकला पाहिजे -शरद पवार

Sachin Salve | Updated On: Mar 11, 2016 11:04 PM IST

 pawar on amir3

नवी मुंबई -11 मार्च : मुंबईत येणार्‍या परप्रांतीयांना आमचा विरोधात नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. मुंबई व्यापार्‍यांनी सोडू नये. मुंबईमध्ये मराठी टक्का टिकला पाहिजे असंही पवार म्हणाले. ते नवी मुंबईत बोलत होते.

नवीमुंबईतील एपीएमसी मार्केटच्या दि फ्रूट एंड व्हेजिटेबल मर्चंटस असोसिएशन 75 वा अमृत महोत्सवासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,पणन मंत्री चंद्रकांत पाटील,पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी मुंबईतील घटणार्‍या मराठी माणसांच्या टक्केवारी बाबत शरद पवार यांनी खंत व्यक्त केली. तसंच, चंद्रकांत पाटील यांनी फळ आणि भाज्या एपीएमसी मार्केटमधून वगळण्याच्या केंद्र सरकारचा असला तरी कुठलीही घाई न करता योग्य निर्णय घेऊ. निर्णयाबाबत लवकरच मार्ग काढू असं सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 11, 2016 10:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close