S M L

मद्यधुंद बस चालकाने पोलीस कॉन्स्टेबलला चिरडले

Sachin Salve | Updated On: Mar 12, 2016 05:35 PM IST

मद्यधुंद बस चालकाने पोलीस कॉन्स्टेबलला चिरडले

ठाणे -12 मार्च : ठाणे महानगर पालिकेची परिवहन सेवा आणि त्यांचे अपघाताचे किस्से ठाणेकराना नवीन नाहीत. शुक्रवारी रात्री देखील असाच मोठ्या अपघातांमधून ठाणेकर प्रवासी वाचले आहेत. परिवहन सेवेच्या चालकाने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असतनाच त्याला हटकणार्‍या वाहतूक शाखेच्या पोलीस शिपायाला आपला जीव गमवावा लागला. मंद्यधुंद चालकाने पोलीस शिपायाला बसखाली चिरडलं यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.चालक गजानन शेजूळ याला ठाणे न्यायालयाने 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या अपघातानंतर मृत साळुंके या वाहतूक पोलीस कर्मचार्यांचा कुटुंबियांनी नेत्रदानही केले आहे.

thane_police3ठाणे महानगर पालिकेची टीएमटी अथवा परिवहन सेवा असणार्‍या बसेसची सेवा इतर महानगर पालिकेच्या हद्दीत जात असते. शुक्रवारी देखील रात्री 11 च्या सुमारास काशिमिरा येथून परिवहन सेवेचे मद्यधुंद अवस्थेत असलेले चालक गजानन शेजूळ हे ठाण्याच्या दिशेने गाडी घेवून निघाले असताना मद्यधुंद अवस्थेत असणार्‍या शेजूळ यांची अवस्था पाहून वाहकाने नजीकच्या एका बसथांब्यावर 40 हून अधिक प्रवाश्यांना उतरविले आणि स्वत:ही गाडीतून उतरला. त्यामुळे प्रवाश्यांचे जीव तर वाचले.

शेजूळ याने ठाणे महानगर पालिकेच्या गायमुख येथील जकात नाका येथे गाडी आणली असता. वाहतूक शाखेचे 44 वर्षी पोलीस शिपाई चंद्रकांत साळुंखे यांनी त्यांना हटकले असता त्यांनी त्यांना धडक दिली त्यातच साळुंखे यांचा रात्री 1 च्या सुमारास मृत्यू झाला. साळुंखे यांचा एक मुलगा 10 वीची परीक्षा देत आहे तर त्यांची मुलगी आठव्या इयत्तेत शिकत आहेत. कर्तव्यावर असणार्‍या साळुंखे यांनी मृत्यू पूर्वी नेत्रदानाचा संकल्प केला होता.

त्यामुळे त्याचं नेत्रदान करण्यात आले असून त्यांचा मृतदेह गावी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी परिवहन सेवेच्या चालकाला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर कलम अन्वये 304,279,339,338गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाणे न्यायालयाने त्याला 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या अंगात 279 टक्के अल्काहोल असल्याच आढळून आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 12, 2016 05:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close