S M L

हाडे जोडणार्‍या रसायनाचा शोध

प्रीती खान, मुंबई15 मार्चअपघातामुळे फ्रॅक्चर झालेल्या हाडांना जोडणे म्हणजे हाडांच्या सर्जनसमोर आव्हान असते. पण आयआयटीच्या केमिकल इंजीनिअरिंग डिपार्टमेन्टने हे काम सोपे केले आहे. त्यांनी नैसर्गिकरित्या हाडे जोडणार्‍या रसायनाचा शोध लावला आहे. अशा प्रकारचे जगातील हे पहिले संशोधन असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. डॉ. विवेक सोनी. मॅक्सिलोफेशल तज्ज्ञ, म्हणजेच डोके आणि चेहर्‍याच्या हाडाचे तज्ज्ञ. अपघातामुळे मल्टिपल फॅक्चर झालेल्यांचा चेहरा पहिल्यासारखा करण्याचे काम ते करतात. हाडे जोडण्यासाठी कुठलेही रसायन उपलब्ध नाही, अशी डॉ. सोनींची तक्रार होती.डॉ. सोनींची ही अडचण ऐकून मुंबईतील आयआयटी केमिकल इंजीनिअरींग डिपार्टमेन्टची टीम कामाला लागली. या टीमचे नेतृत्व केले, डॉ. जयेश बेलारे यांनी. आणि त्यांनी शोधले, बोनग्राफ्टिंग मटेरीअल. हे फक्त हाडेच जोडत नाही, तर तुटलेल्या हाडाची नैसर्गिकरित्या वाढही करते. आणि नंतर ते पूर्णपणे शरिरात विरघळून जाते. बॉम्बे व्हेटनरी कॉलेजमध्ये सशावर याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. आता हे संशोधन पेटंट मिळविण्यासाठी भारत सरकारच्या इंडियन पेटंट ऑफिसमध्ये पाठवण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2010 11:24 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2010 11:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close