S M L

राज ठाकरेंना धमकावणार्‍या भाजप नेत्याच्या कार्यालयावर हल्ला

Samruddha Bhambure | Updated On: Mar 13, 2016 01:46 PM IST

राज ठाकरेंना धमकावणार्‍या भाजप नेत्याच्या कार्यालयावर हल्ला

मुंबई – 13 मार्च : भाजप नेते मोहित कंबोज यांच्या दिंडोशीमधल्या कार्यालयावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे. मोहित कंबोज हे मुंबई भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष आहेत. उत्तर भारतीयांचं मुंबईमध्ये तुम्ही किंवा तुमच्या कार्यकर्त्यांनी काही नुकसान केलं तर त्याच्यापेक्षा दुप्पट नुकसान तुमचं करू, असं खुलेआम पत्र लिहून कंबोज यांनी राज ठाकरे यांना धमकी दिली होती.

तुम्हाला प्रेमाची भाषा समजत नसेल आणि फक्त मारहाणीचीच भाषा समजत असेल, तर ईंट का जवाब पथ्थर से देंगे असेही या पत्रात कंबोज यांनी म्हटलं होतं. तसेच, हे पत्रक त्यांनी सोशल मिडियावरही प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी कंबोज यांच्या कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांनीच हल्ला केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

राज ठाकरे यांनी मनसेच्या दहाव्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलताना नव्या रिक्षा रस्त्यावर आल्या तर, जाळून टाका असा आदेश दिला होता. नव्या देत असलेल्या रिक्षा परवान्यांमध्ये परप्रांतीय रिक्षाचालकांचा भरणा अधिक असल्याचा त्यांनी आरोप केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 13, 2016 01:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close