S M L

सिक्स्थ सेन्सचा जादूगार

15 मार्चमुंबईतील प्रणव मिस्त्रीचे टीईडी प्रेझेंटेशन सध्या चर्चेचा विषय आहे. आयआयटीत शिकलेला आणि मूळचा उत्तर गुजरातच्या पालनपूरचा असलेला प्रणव सध्या अमेरिकेत संशोधन करत आहे. डिजीटल विश्वात त्याने एक भन्नाट कल्पना आणली आहे. ही कल्पना म्हणजे सिक्स्थ सेन्स...डिजीटल जगाला आपल्या तालावर, नव्हे हाताच्या बोटांवर नाचवण्याची करामत 28 वर्षांच्या प्रणवकडे आहे. प्रणवने ही आयडिया प्रत्यक्षात आणली आणि टेक्नॉलॉजीला बोटांच्या चिमटीत आणले. त्याच्या या प्रोजेक्टचे नाव आहे, सिक्स्थ सेन्स. तुम्ही चालता चालता एखादी फ्रेम निवडली तर हवा तो फोटो क्लिक करु शकता. इतकेच नाही तर तो फोटो एखाद्या भिंतीवर पाहूही शकता. आणि एडिट करु शकता हातावर... तळव्यावर मोबाईलचे की पॅड बघून त्यावर नंबर डायल करु शकता. पुस्तकाच्या दुकानात गेलात आणि पुस्तक खरेदी करायचे, तर पुस्तकाचे इंटरनेटवर रेटिंग तिथल्या तिथे पाहू शकता. इतकेच नाही तर त्याचा रिव्ह्यूही चटकन पाहू शकता.दुकानात वस्तू खरेदी करण्याआधी त्यांची इत्थंभूत माहिती घेऊ शकतो. कधीही, केव्हाही, कुठेही तुम्ही तुमच्या सिक्स्थ सेन्ससोबत फिरु शकता. आणि अगदी विमानाच्या तिकिटावरवरच विमानाची वेळ पाहू शकता.जादूई करामतीसारख्या वाटणार्‍या या प्रोजक्टसाठी प्रणवला खर्च आला फक्त 300 डॉलर्स. भारतीय किंमतीनुसार 13 हजारांच्या आसपास. इलेक्ट्रॉनिक भंगारातून जमवाजमव करत त्याने पहिले सिक्स्थ सेन्स मशिन बनवले. त्याच्या या सिक्स्थ सेन्स प्रोजक्टमध्ये त्याने कम्युटर स्क्रिन, माऊस आणि कीबोर्ड बाद केलेत.गळ्यात आपल्या तसेच समोरच्या हालचाली टिपणारा कॅमेरा म्हणजेच डिजीटल आय, प्रोजेक्टर आणि बोटांवर लावलेले क्लिप्स यांच्या मदतीने त्याने हे जमवून आणले. त्याचा हा प्रोजेक्ट टीईडीने पुढे आणला. टीईडी ही आयडिया लोकांपर्यंत पोहचवणारी एक नॉन प्रॉफिट संस्था. टेक्नॉलॉजी, एंटरटेन्मेंट आणि डिझाईन या तीन क्षेत्रांमधील क्रिएटीव्ह आयडिया जगासमोर आणण्याचे काम ती करते. त्यांच्या लाँग बीचच्या परिषदेत प्रणवने सिक्स्थ सेन्सचे प्रेझेंटेशन केले. आणि तेथील शास्त्रज्ञ, तज्ज्ञ आणि अभ्यासकांना अवाक केले.सध्या प्रणव अमेरिकेत एमआयटी मीडिया लॅबमध्ये पीएचडी करत आहे. डिजीटल जगाला प्रत्यक्ष वास्तवात आणणार्‍या प्रणवला याचे पेटंट नको, तर ते अधिकाधिक लोकांनी वापरावे असा त्याचा अट्टाहास आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2010 12:06 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2010 12:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close