S M L

आपण काय आदेश देतो याचा विचार करावा, राणेंचा राजना सल्ला

Sachin Salve | Updated On: Mar 14, 2016 09:11 AM IST

आपण काय आदेश देतो याचा विचार करावा, राणेंचा राजना सल्ला

 शिर्डी - 14 मार्च : आपण काय आदेश देतोय त्याचा काय परिणाम होतो याचा विचार करणे गरजेच असून कायदा सुव्यवस्था कुणीही बिगडवू नये. विधायक कामे करून प्रसिद्धी मिळवा असा सल्ला काँग्रेसचे नेते नारायण राणेंनी राज ठाकरे यांना दिलाय. एवढ्या वर्षात मराठी माणसाचे हित कोणी जोपासले हे जनतेला ठाऊक असल्याची टीकाही राणेंनी केली.

शिर्डीत महिला प्रशिक्षण शिबिराचा समारोप काल नारायण राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी राज ठाकरे यांच्या रिक्षा आंदोलनावर सडकून टीका केली. विधायक कामे करून प्रसिद्धी मिळवण्याचा सल्ला त्यांनी राज ठाकरे यांना दिला.

तसंच आरएसएसने आता हाप पँट ऐवजी फुल पँट वापरण्याचा निर्णय घेतलाय याचा अर्थ आरएसएसचे 'अच्छे दिन' सुरू झालेत मात्र गोरगरीब जनता आजही होरपळत आहे. पंतप्रधान आपले असल्याचं वाटतच नाही. आजही कुपोषण , शिक्षणाचे प्रश्न असताना मोदी मात्र अकरा लाखाचा सूट वापरतायत अशी टीकाही नारायण राणेंनी केली.

भाजपा सेना सत्तेसाठी खोटनाट बोलतात. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे भाजप-सेनेच खरंरुप आता जनतेसमोर आलंय अशी टीकाही राणेंनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2016 09:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close