S M L

सांगलीत भाडेकरूच्या घरात सापडलेल्या 3 कोटी रुपये हवालाचे?

Samruddha Bhambure | Updated On: Mar 14, 2016 10:52 PM IST

सांगलीत भाडेकरूच्या घरात सापडलेल्या 3 कोटी रुपये हवालाचे?

सांगली- 14 मार्च : मिरजेतील एका घरातून तब्बल तीन कोटी रुपये सांगली पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणी मैनुद्दीन मुल्ला नामक या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे सांगलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही रोकड हवालामार्फत आल्याचं स्पष्ट झालं असून जप्त केलेली रक्कम कर्नाटकातील खासदारांची नसल्याचंही तपासातून पुढे आलं आहे.

सांगलीत नव्या बुलेटवरून फिरणार्‍या मैनुद्दीन मुल्ला या तरुणाला संशयास्पद वर्तनावरून पोलिसांनी ताब्यात घेतलं. तेव्हा त्याच्याकडे लाख रुपये सापडले. याबाबत चौकशी केली असता घरी आणखी पैसे असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्याच्या मिरजेतील घरावर छाप्यात 4-5बॅगा भरून हजार पाचशेच्या नोटांचे बंडल सापडले. ही रक्कम सुमारे तीन कोटी रुपये आहे.

विशेष म्हणजे मैनुद्द्दिन मुल्ला हा बेथेलहेमनगर इथल्या भाड्याच्या एका घरात राहत असून खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतो. त्यामुळे एवढी मोठी रक्कम कुठून आली, कोणी दिली याबाबत सांगली पोलीस तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2016 07:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close