S M L

छगन भुजबळांच्या अटकेनंतर धुळ्यात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

Samruddha Bhambure | Updated On: Mar 15, 2016 12:05 PM IST

छगन भुजबळांच्या अटकेनंतर धुळ्यात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

धुळे– 15 मार्च : एकीकडे छगन भुजबळ यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलन करत असताना, धुळ्यात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. धुळ्यात भाजप आमदार अनिल गोटे यांच्या समर्थकांनी शहरात फटाके फोडून आणि ढोलताशे वाजवत जल्लोष केला.

छगन भुजबळ यांच्या अटकेची बातमी येताच धुळयातील भाजप आमदार अनिल गोटे यांचे कार्यकर्ते, समर्थकांनी रस्त्यावर उतरुन फटाके फोडून आनंद साजरा केला. 2003-04 साली राज्यात गाजलेल्या तेलगी स्टॅम्प घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ आणि आमदार अनिल गोटे यांच्यावरही घोटाळ्यात सहभागी असल्याचे आरोप झाले होते. जुलै 2003 मध्ये गोटे यांना अटक झाली ते चारवर्ष तुरुंगात होते. मात्र त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्याने त्यांची सुटका झाली. मात्र यामुळे भुजबळ आणि अनिल गोटे यांच्यात कटुता निर्माण झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 15, 2016 10:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close