S M L

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा असाही 'घोटाळा', आंदोलनाच्या नावाखाली वृद्धांना उतरवलं रस्त्यावर

Sachin Salve | Updated On: Mar 15, 2016 07:06 PM IST

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा असाही 'घोटाळा', आंदोलनाच्या नावाखाली वृद्धांना उतरवलं रस्त्यावर

 

कोल्हापूर - 15 मार्च : महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या अटकेच्या विरोधात राष्ट्रवादीचे समर्थक रस्तावर उतरले आहे. पण, समर्थकांनीच आंदोलनात घोटाळा केला. आंदोलनाच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावर आणण्याचा संतापजनक प्रकार कोल्हापुरात समोर आलाय.

भुजबळांच्या अटकेच्या निषेधार्थ कोल्हापूर शहरात रास्ता रोको करण्यात आलं होतं. यामध्ये हुपरी गावातून 40 ते 50 वृद्ध महिला सहभागी झाल्या होत्या. मात्र, जेव्हा आम्ही या महिलांना आंदोलनातील सहभागाविषयी विचारलं तेव्हा पेन्शन आंदोलनाचं नाव सांगून आम्हाला आणल्याचं या महिलांनी सांगितलं. महत्वाचं म्हणजे पोलिसांनी या वृद्धांना ताब्यातही घेतलंय. आंदोलनाच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार संतापजनक असल्याचं नागरिकांच म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 15, 2016 05:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close