S M L

भुजबळांना जामीन नाही, 2 दिवस ईडीच्या कोठडीत मुक्काम

Sachin Salve | Updated On: Mar 15, 2016 08:31 PM IST

भुजबळांना जामीन नाही, 2 दिवस ईडीच्या कोठडीत मुक्काम

15 मार्च : मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचा दोन दिवस मुक्काम आता ईडीच्या कोठडीत असणार आहे. छगन भुजबळ यांना जामीन नाकारण्यात आलाय. मुंबई सेशन्स कोर्टाने त्यांना 2 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

महाराष्ट्र सदन बांधकामात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी सोमवारी छगन भुजबळ यांना 11 तासांच्या मॅरेथान चौकशीनंतर अंमलबजावणी संचनालय अर्थान ईडीने अटक केली. छगन भुजबळांच्या अटकेमुळे राज्यात राजकीय भूकंप घडला. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामनाच राज्यभर पाहण्यास मिळाला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठिकठिकाणी निदर्शनं करत आहे.

तर दुसरीकडे ईडीने छगन भुजबळांना आज दुपारी मुंबई सेशन्स कोर्टात हजर केलं.छगन भुजबळांची बाजू यावेळी वकील तेजल यादव यांनी मांडली तर ईडीच्या वतीनं हितेन वेणगावकर यांनी त्यांची बाजू मांडली. त्याआधी त्यांची सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी झाली. तब्बल 2 तासांच्या युक्तीवादानंतर भुजबळांना कोर्टाने 2 दिवसांची ईडी कोठडी सुनावली. ईडीच्या वकिलांनी भुजबळांना तब्बल 40 प्रश्न विचारले. 887 कोटींची रक्कम आली कुठून आणि हा व्यवहार झाला कसा ? असा सवाल भुजबळांना विचारला असता यावर भुजबळांनी मौन बाळगले.

याआधीही समीर भुजबळांना अटक करण्यात आली. त्यानंतर पंकज भुजबळांची चौकशी झाली. पण, तिघांच्या चौकशीत एकवाक्यता आढळून आली नाही. तिघांनीही 887 कोटींचा व्यवहार झाला कसा याचा खुलासा करू शकले नाही. आता ईडीने या तिघांचीही आणि इतर आरोपींची समोरासमोर बसवून चौकशी करण्यासाठी कोर्टाकडे छगन भुजबळांची 3 दिवसांची कोठडी मागितली.परंतु, कोर्टाने 2 दिवसांची कोठडी दिली आहे.

आपल्या विरोधात कोणतेही पुरावे नाही, आपण निर्दोष असल्याचा युक्तीवादही भुजबळांनी केला. पण, त्याचा काही फायदा झाला नाही. आता या दोन दिवसांत भुजबळांची चांगलीच झाडाझडती होणार असून राज्याचे उप-मुख्यमंत्री आता दोन दिवस कोठडीत मुक्कामी राहणार आहे.

ईडीच्या वकिलांचा सत्र न्यायालयात युक्तिवाद

- छगन भुजबळांच्या उत्पन्न स्त्रोतांवर संशय

- मंत्रिपदाचा फायदा घेत भुजबळांनी पैसे जमावले.

- भुजबळांच्या कंपन्यातील संचालक बनावट

- छगन भुजबळ चौकशीत सहकार्य करत नाहीत - ईडीचा दावा

- मंत्रिपदाचा फायदा घेत भुजबळांनी पैसे जमवले - ईडीचा आरोप

- भुजबळांच्या कंपन्यांमधील संचालक बनावट - ईडीचा युक्तिवाद

- सेशन्स कोर्टामध्ये सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी ईडीच्या वकिलांना विचारलं की, "तुम्हाला छगन भुजबळ यांची कोठडी का हवी आहे?" यावर ईडीने, सहआरोपींसह छगन भुजबळ यांची चौकशी करायची आहे असं उत्तर दिलं. यावर भुजबळांनी मी दिवसरात्र येऊन चौकशीत सहकार्य करायला तयार आहे असं सांगितलं.

ईडीकडून भुजबळांच्या कोठडीसाठी कऱण्यात आलेल्या अर्जातले मुद्दे

- बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात भुजबळ यांचा आपला मुलगा आणि पुतण्यासह सहभाग

- भुजबळांचा परवेश कन्स्ट्रक्शन बेहिशेबी मालमत्ता प्रकऱणातला सहभाग स्पष्ट

- त्यामुळे पैशाचा झालेला व्यवहार अधिक स्पष्ट होण्यासाठी भुजबळांच्या कोठडीची आवश्यकता

- जर जामीन मिळाला तर ते पुराव्यांशी छेडछाड करण्याची भीती

- भुजबळ चौकशीत सहकार्य करत नाहीत

- आतापर्यंत केवळ 114 कोटींचा छडा

- 750 कोटींचा व्यवहाराविषयी अद्याप माहिती नाही

- महाराष्ट्र सदन प्रकरणी एम.एस.चमणकर यांनी भुजबळ कुटुंबियांच्या ओरिजिन इन्फ्रास्टक्चरला 6.03 कोटी दिले

- प्राईम बिल्डर आणि डेव्हलपरकडून 18.05 कोटींचे अपारदर्शक व्यवहार

- चमणकर एन्टरप्राईझेसला काम देण्यात भुजबळांनी पदाचा वापर केला

- एमईटीच्या ऑफिसमध्ये कोटींचे गैरव्यवहार

- मात्र असे कोटी रुपयांचे व्यवहार न झाल्याचा भुजबळांचा दावा

- मंत्रिपदाचा भुजबळांनी दुरुपयोग केला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 15, 2016 06:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close