S M L

भुजबळ कोठडीत, कोर्टात काय घडलं ?

Sachin Salve | Updated On: Mar 15, 2016 08:57 PM IST

भुजबळ कोठडीत, कोर्टात काय घडलं ?

 15 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना सेशन्स कोर्टाने दोन दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. छगन भुजबळांची बाजू यावेळी वकील तेजल यादव यांनी मांडली तर ईडीच्या वतीनं हितेन वेणगावकर यांनी त्यांची बाजू मांडली. सेशन्स कोर्टात सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी ईडीच्या वकिलांना विचारलं की, "तुम्हाला छगन भुजबळ यांची कोठडी का हवी आहे? यावर ईडीने, सहआरोपींसह छगन भुजबळ यांची चौकशी करायची आहे असं उत्तर दिलं. यावर भुजबळांनी मी दिवसरात्र येऊन चौकशीत सहकार्य करायला तयार आहे असं सांगितलं.

छगन भुजबळ म्हणाले,

- छगन भुजबळ कोर्टात भावुक झाले होते

- एकही आरोप सिद्ध होणार नाही असा दावा त्यांनी केला

- यामागे राजकीय व्यक्ती आहे

- मला अटक करुन काय करणार?

- ह्या गोष्टी लोकांनी तयार केल्या आहेत

- या सगळ्या प्रकरामागे राजकीय व्यक्ती

- माझ्याविरोधातला एकही आरोप सिद्ध होऊ शकत नाही

- कॉन्ट्र्‌ॅक्टरच्या व्यवहाराबाबत मला काही माहित नाही

- तुम्ही मला अटक करुन काय कऱणार

- मी तीन वेऴा उपमुख्यमंत्री होतो आणि जगभर फिरलो

- महाराष्ट्र सदन प्रकऱणी सरकारचा फायदाच झाला होता नाहीतर ही जागा विकासकांकडे गेली असती

ईडीच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला ?

- पैशांचे सगळे व्यवहार हे मुंबई एज्युकेशन ट्रस्ट अर्थात MET च्या माध्यमातून झाले.

- बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून कोट्यवधींच्या देणग्या मिळाल्या.

- छगन भुजबळ त्यांच्या स्वत:च्या अकाऊंडविषयीही अधिक माहिती देत नाहीत

- भुजबळ चौकशीत सहकार्य करत नाहीत

यावर भुजबळ वकिलांनी बाजू मांडताना 800 कोटींचा आकडा हा हवेतला असल्याचा दावा केला. भुजबळ म्हणतायत मला माहित नाही याचा अर्थ ते सहकार्य करत नाहीत असं म्हणणं चूक आहे.

यावर मग ईडीचे वकील म्हणाले की, कंपन्यांच्या संचालकांशी बोललो तेव्हा बहुसंख्य संचालकांनी हे कबूल केलं की, भुजबळांच्या कंपन्या बनावट आहेत. एक दशक भुजबळांनी महत्त्वाचं पद भूषवलं आणि याच काळात त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवली याचं कनेक्शन सर्वांना माहित आहे असंही ईडीच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं.

ईडीच्या वकिलांचा सत्र न्यायालयात युक्तिवाद

- छगन भुजबळांच्या उत्पन्न स्त्रोतांवर संशय

- मंत्रिपदाचा फायदा घेत भुजबळांनी पैसे जमावले.

- भुजबळांच्या कंपन्यातील संचालक बनावट

- छगन भुजबळ चौकशीत सहकार्य करत नाहीत - ईडीचा दावा

- मंत्रिपदाचा फायदा घेत भुजबळांनी पैसे जमवले - ईडीचा आरोप

- भुजबळांच्या कंपन्यांमधील संचालक बनावट - ईडीचा युक्तिवाद

- सेशन्स कोर्टामध्ये सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी ईडीच्या वकिलांना विचारलं की, "तुम्हाला छगन भुजबळ यांची कोठडी का हवी आहे?" यावर ईडीने, सहआरोपींसह छगन भुजबळ यांची चौकशी करायची आहे असं उत्तर दिलं. यावर भुजबळांनी मी दिवसरात्र येऊन चौकशीत सहकार्य करायला तयार आहे असं सांगितलं.

ईडीकडून भुजबळांच्या कोठडीसाठी कऱण्यात आलेल्या अर्जातले मुद्दे

- बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात भुजबळ यांचा आपला मुलगा आणि पुतण्यासह सहभाग

- भुजबळांचा परवेश कन्स्ट्रक्शन बेहिशेबी मालमत्ता प्रकऱणातला सहभाग स्पष्ट

- त्यामुळे पैशाचा झालेला व्यवहार अधिक स्पष्ट होण्यासाठी भुजबळांच्या कोठडीची आवश्यकता

- जर जामीन मिळाला तर ते पुराव्यांशी छेडछाड करण्याची भीती

- भुजबळ चौकशीत सहकार्य करत नाहीत

- आतापर्यंत केवळ 114 कोटींचा छडा

- 750 कोटींचा व्यवहाराविषयी अद्याप माहिती नाही

- महाराष्ट्र सदन प्रकरणी एम.एस.चमणकर यांनी भुजबळ कुटुंबियांच्या ओरिजिन इन्फ्रास्टक्चरला 6.03 कोटी दिले

- प्राईम बिल्डर आणि डेव्हलपरकडून 18.05 कोटींचे अपारदर्शक व्यवहार

- चमणकर एन्टरप्राईझेसला काम देण्यात भुजबळांनी पदाचा वापर केला

- एमईटीच्या ऑफिसमध्ये कोटींचे गैरव्यवहार

- मात्र असे कोटी रुपयांचे व्यवहार न झाल्याचा भुजबळांचा दावा

- मंत्रिपदाचा भुजबळांनी दुरुपयोग केला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 15, 2016 07:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close