S M L

किवीचं भारतासमोर 127 धावांचं आव्हान

Sachin Salve | Updated On: Mar 15, 2016 11:09 PM IST

किवीचं भारतासमोर 127 धावांचं आव्हान

 

16 मार्च : टी-20 वर्ल्डकपच्या सलामी सामन्यात भारतीय स्पीनिर्सने कमाल दाखवत न्यूझीलंड संघाला 126 धावांत गुंडाळलं. न्यूझीलंडने पहिली बॅटिंग करत भारतासमोर 127 धावांचं आव्हान दिलंय.

टी-20 वर्ल्ड कपला आज धडाक्यात सुरुवात झाली. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंडदरम्यान सलामी सामना सुरू आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकत पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी उतरलेल्या मार्टिंन गुप्टिलने पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर सिक्स लगावत धडाकेबाज सुरूवात केली. पण, दुसर्‍याच बॉलवर आर.आश्विनने गुप्टिलला आऊट केलं. त्यानंतर दुसर्‍याच ओव्हरमध्ये आशिष नेहराने कॉलिन मन्रोलाही तंबूत पाठवलं.

यानंतर न्यूझीलंडने मुकाबला करायचा प्रयत्न केला पण सुरेश रैनाने न्यूझीलंड कॅप्टन केन विल्यमसनला स्टंपिंगने आऊट केलं.रैनाने फिल्डिंग करताना कमाल करत डायरेक्ट हिटने रॉस टेलरला आऊट केलं. पिचचा अंदाज घेत धोणीने स्पीनिर्सची फौज उतरवली. स्पीनिर्सने किवीला उतरती कळा लावली. किवीने संयमी बॅटिंग करत सहा विकेटवर कसाबसा 100 चा टप्पा ओलांडला. अखेरच्या दोन ओव्हरमध्ये लुईक रोंचीने 21 रन्स कुटत 126 चा टप्पा गाठला. निर्धारित 20 ओव्हरमध्ये किवीने 7 विकेटवर 126 रन्स पूर्ण केले. भारतासमोर आता विजयासाठी 127 धावांचं आव्हान आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 15, 2016 09:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close