S M L

हा राजकीय सूड नसून काळाने घेतलेला सूड - उद्धव ठाकरे

Samruddha Bhambure | Updated On: Mar 16, 2016 11:29 AM IST

हा राजकीय सूड नसून काळाने घेतलेला सूड - उद्धव ठाकरे

मुंबई - 16 मार्च : राज्याचे गृहमंत्री असताना शिवसेनाप्रमुखांना तुरुंगात पाठण्याचा छगन भुजबळांनी विडाच उचलला होता. आज भुजबळही त्याच मार्गाने तुरुंगात गेलेत. हा राजकीय सूड नसून काळाने घेतलेला सूड आहे, अशी चपराक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावली आहे.

महाराष्ट्र सदन, मनी लाँडरिंग आणि अन्य घोटाळ्यांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं छगन भुजबळ यांना सोमवारी रात्री अटक केली. त्यावरून राजकारण तापलंय. ही कारवाई सूडबुद्धीने प्रेरित असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह सर्व विरोधकांनी केला आहे, तर घाटाळे दाबण्यास सरकार मदत करणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावलंय. या चकमकीत उद्धव ठाकरे यांनी आज 'सामना'च्या अग्रलेखातून प्रतिक्रिया दिली आहे.

अटकेनंतर भुजबळ तडफडून म्हणाले, 'हा अन्याय आहे. राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई होत आहे.' पण, गृहमंत्री असताना काहीकरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तुरुंगात पाठवण्याचा विडाच त्यांनी उचलला होता. प्रखर हिंदुत्ववादी भाषण केल्याच्या गुन्ह्याखाली शिवसेनाप्रमुखांच्या अटकेचा अट्टहास करून महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला वेठीस धरण्याचा 'द्रोह' तेव्हा भुजबळ यांनी केला आणि तेसुद्धा राजकीय सूड आणि व्यक्तिगत द्वेषाचेच राजकारण होतं. त्यामुळे राजकीय सूडावर आक्रोश करण्याचा हक्क भुजबळांनी गमावला असल्याचा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगवाला आहे.

भुजबळ हे शिवसेनेत होते तेव्हा त्यांना अनेकदा अटक झाली. बेळगावातील अटकेमुळे ते हिरो झाले होते. पण यावेळी पण भुजबळांना आता झालेली अटक ही भ्रष्टाचार, लपवाछपवी अशा गुन्ह्यांसाठी आहे. हा फरक समजून घेतला पाहिजे, अशी कोपरखळीही ठाकरेंनी मारली आहे. राज्याचे गृहमंत्री असताना भुजबळांनी अनेकांना तुरुंगात पाठवले होतं. ज्यांनी त्यांचे ऐकले नाही अशा अनेकांना खोटी प्रकरणे तयार करून, पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून तुरुंगात पाठवलं. मुंबई विद्यापीठाचे तेव्हाचे कुलगुरू शशिकांत कर्णिक हे त्यांच्याच कारस्थानाचे बळी ठरले, त्याची आठवणही या अग्रलेखात करून देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2016 11:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close