S M L

'भारतमाता की जय' न म्हणणारे एमआयएमचे आमदार वारिस पठाण निलंबित

Sachin Salve | Updated On: Mar 16, 2016 05:48 PM IST

'भारतमाता की जय' न म्हणणारे एमआयएमचे आमदार वारिस पठाण निलंबित

 

मुंबई - 16 मार्च : 'भारत माता की जय' या घोषणेवरून लोकसभेत गाजलेला वाद आज (बुधवारी) महाराष्ट्राच्या विधानसभेत गाजला. 'भारत माता की जय' म्हणणार नाही, असं म्हणणारे भायखळ्याचे एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांना अधिवेशन काळापर्यंत निलंबित करण्यात येणार आहे.

विधानसभेत भाजपचे आमदार राम कदम यांनी एमआयएमचे आमदार वारिस पठाण आणि इम्तिायाज जलील यांच्याकडे बघून 'भारत माता की जय' असे उद्गार काढले. त्यावर वारिस पठाण यांनी 'मी भारत माता की जय' असं म्हणणार नाही, असं उत्तर दिलं. त्याला सगळ्याच पक्षांच्या आमदारांनी विरोध केला. वारिस पठाण यांना निलंबित करावं, अशी मागणी सगळ्यांनी लावून धरली आणि एकच गदारोळ झाला. यानंतर सभागृहाचं कामकाज काही काळासाठी तहकूब करावं लागलं.

हा संपूर्ण देशाचा अपमान आहे, अशा सदस्यांना निलंबित करणं म्हणजे देशाची सेवा करणं होईल, अशी भूमिका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी घेतली.

तर या सभागृहाच्या आणि लोकसभेच्या इतिहासाताल हा काळा दिवस आहे. या देशाचा स्वातंत्रलढा जात धर्माच्या पलीकडे लढला गेला. या देशाबद्दल असे उद्गार काढणार्‍यांनी या ठिकाणी माफी मागायला सांगा अथवा निलंबन करा अथवा कार्यकाळ संपेपर्यंत त्यांना निलंबित करा अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली.

त्यावर राज्यपालांच्या अभिभाषणावरची चर्चा बाजूला ठेवा पण अशा देशद्रोहींना जागा दाखवा, त्यांच निलंबन करा, अशी जोरदार मागणी शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी लावून धरली. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी गटनेत्यांच्या बैठकीनंतर वारिस पठाण यांच्या निलंबनाचा निर्णय घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2016 05:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close