S M L

देशाचा कधीही अपमान केला नाही आणि करणारही नाही -वारिस पठाण

Sachin Salve | Updated On: Mar 16, 2016 10:45 PM IST

देशाचा कधीही अपमान केला नाही आणि करणारही नाही -वारिस पठाण

मुंबई-16 मार्च : 'भारत माता की जय' म्हणण्यास नकार दिल्यामुळे एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांना निलंबित कऱण्यात आलंय.पण, आपण विधिमंडळाच्या नियमाचं कोणतही उल्लंघन केलं नाही. माझं देशप्रेम आजही कायम आहे. या देशाचा मी कधीच अपमान केला नाही असं स्पष्टीकरण वारिस पठाण यांनी दिलंय.

आज विधानसभेत भाजपचे आमदार राम कदम यांनी एमआयएमचे आमदार वारिस पठाण आणि इम्तिायाज जलील यांच्याकडे बघून 'भारत माता की जय' असे उद्गार काढले. त्यावर वारिस पठाण यांनी 'मी भारत माता की जय' असं म्हणणार नाही, असं उत्तर दिलं. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी वारिस पठाण यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलंय.

यावर वारिस पठाण यांनी स्पष्टीकरण दिलंय. माझं देशप्रेम आजही कायम आहे.मी या देशात जन्मलो आणि या मातीतचं मरणार आहे. त्यामुळे मी या देशाचा कधीही अपमान केला नाही आणि कधी करणार नाही. माझं निलंबत म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्या सारखं आहे. मी विधिमंडळाच्या नियमचं कोणतेही उल्लंघन केलं नाही. अध्यक्षांनी माझ्या निलंबनाचा विचार करावा अशी मागणी पठाण यांनी केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2016 10:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close