S M L

फुटलेली पाईपलाईन जोडली

17 मार्चनवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकरांना दोन दिवसांच्या पाणीकपातीला तोंड द्यावे लागत आहे. भिवंडीजवळील वळपाडा गावाजवळ सोमवारी पाइपलाईन फुटली होती. ही पाईपलाईन जोडणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आणखी 5 ते 6 तासांनंतर पाणी पुरवठा सुरु होणार असल्याचे समजते. पण हा पाणी पुरवठा सध्या कमी दाबानेच होणार आहे.नेहमीच फुटते पाईपलाइन रवी शिंदे, उदय जाधव मुंबई मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या पाईपलाइन फुटणे हे काही नवीन नाही. दरवेळी पाईपलाइन फुटते आणि बीएमसीचे कामगार त्याची तातडीने दुरूस्ती करतात. पण या पाईपलाईन आता दीडशे वर्षे जुन्या झाल्या आहेत. त्या बदलल्या का जात नाहीत, किंवा त्यांचा योग्य तो मेंटेनन्स का ठेवला जात नाही? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.भिवंडीजवळच्या वळपाडा गावाजवळ तानसा धरणातून मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आणि मुंबईकरांना अतिरिक्त पाणीकपातीचा सामना करावा लागला. मुंबईला पाणी पुरवठा करणारे भातसा, तानसा, वैतरणा,अप्पर वैतरणा हे प्रमुख तलाव आहेत. हे सर्व मुंबईपासून सव्वाशे किलोमीटरवर आहेत. एवढ्या अंतरावरुन मुंबईत पाणी आणण्यार्‍या या पाईपलाईन दीडशे वर्षापूर्वी ब्रिटीशांनी टाकल्या होत्या. तेव्हापासून या पाईपलाइन बदलण्यात आलेल्या नाहीत.मेन्टेनन्स वेळवर होत नसल्याने या पाईपलाइन फुटतात. महापालिकेने पाईपलाइनच्या मेंटनससाठी कामगार ठेवलेत. पण सव्वाशे किलोमीटरच्या या पाईपलाईनच्या मेन्टेनन्ससाठी ते अपुरे पडत आहेत.महापालिकेने पाईपलाइन बदलण्यासाठी ब्रिमेस्टोवॅड प्रोजेक्ट हाती घेतला आहे. पण तो पूर्ण होण्यास 2012 साल उजाडेल. पण तोपर्यंत महापालिकेने पाईपलाईनकडे लक्ष दिले नाही तर मुंबईकरांना अशा घटनांना वारंवार सामोरे जावे लागेल हे वास्तव आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2010 10:34 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2010 10:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close