S M L

LIVE : समीर आणि छगन भुजबळ यांची समोरासमोर चौकशी

Sachin Salve | Updated On: Mar 17, 2016 11:22 AM IST

LIVE : समीर आणि छगन भुजबळ यांची समोरासमोर चौकशी

मुंबई - 17 मार्च : मनी लाँड्रिंग आणि महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले माजी सार्वजनिक मंत्री छगन भुजबळ ईडीच्या चौकशीत सर्व प्रश्नांना माहित नाही असं उत्तर देतायत. त्यामुळे छगन आणि समीर भुजबळ या दोघांनाही समोरासमोर बसवून चौकशी करण्याचा निर्णय ईडीच्या अधिकार्‍यांनी घेतलाय. आज सकाळी समीरला ईडीच्या कार्यालयात आणण्यात आलं आहे. दोघांचीही समोरासमोर चौकशी केली जाणार आहे. तर भुजबळांना आज दुपारी तीनच्या सुमाराला जे.जे. रुग्णालयात नेण्यात येणार आहे. तिथून त्यांना कोर्टात हजर केलं जाईल.

भुजबळ यांची प्रकृती स्थिर, दुपारी कोर्टात करणार हजर

छगन भुजबळ यांची ईडी कोठडीत तब्येत बिघडली होती. बुधवारी रात्री त्यांना छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यामुळे त्यांची ईसीजी चाचणी करण्यात आली, अशी माहिती जेजे रुग्णालयाचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. त्यासाठी जेजेच्या 2 डॉक्टरांना पाठवण्यात आलं होतं. सध्या भुजबळ यांची प्रकृती स्थिर आहे.

भुजबळ यांची कोठडी आज संपत आहे. आज जेजे रुग्णालयात त्यांच्या प्रकृतीची पुन्हा तपासणी केली जाणार आहे.त्यानंतर भुजबळ यांना पुन्हा सेशन्स कोर्टात समोर हजर केलं जाणार आहे. दोन दिवसांच्या कोठडीनंतर छगन भुजबळ यांना पुन्हा कोठडी मिळते की सुटका याकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 17, 2016 10:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close