S M L

दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे पालेभाज्या महागल्या

Samruddha Bhambure | Updated On: Mar 17, 2016 10:00 PM IST

दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे पालेभाज्या महागल्या

IMG_20141211_140429 (1)नाशिक - 17 मार्च : गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे पालेभाज्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यात उन्हाच्या कडाका दुष्काळाच्या परिस्थितीचा थेट परिणाम पालेभाज्यांवर झाला आहे. पाण्याअभावी पालेभाज्यांच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली असून, त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे. नाशिकच्या किरकोळ बाजारपेठेत भाज्यांच्या भावात तिपटीनं वाढलं आहेत. यामुळे भाजीचे भाव आकाशाला भिडल्याने गृहिणीचे बजेट बिघडलं आहे.

पाण्याची उपलब्धता नसल्याने उन्हाळ्यात भाजीपाल्याची लागवड शेतकरी करू शकले नाहीत. ज्यांच्याकडे थोडेबहुत पाणी आहे, अशा काही शेतकर्‍यांनी आपापल्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतात पालेभाज्यांची लागवड केली. परंतु मागणीच्या तुलनेत बाजारात कमी प्रमाणात पुरवठा होत असल्याने पालेभाज्यांचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत.

जिल्ह्यातील अनेक भागात दुष्काळ आल्यानं पालेभाज्यांच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे साहजिकच पालेभाज्यांच्या किंमतीत मोठी वाढ झालीय. आठ दिवसांत पालेभाज्यांचे भाव तिपटीने वाढले आहे. भाज्यांचे दर भरमसाठ वाढल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे.

 

पालेभाज्या महागल्या- दर तिपटीनं वाढले

  • मेथी (जुडी) - 8 रुपये - 30 रुपये
  • पालक (जुडी) - 5 रुपये - 15 रुपये
  • भेंडी - 20 रुपये - 30 रुपये
  • वांगी - 20 रुपये - 50 रुपये
  • दुधी भोपळा - 8 रुपये - 14 रुपये
  • घेवडा - 30 रुपये - 60 रुपये
  • गवार - 60 रुपये - 80 रुपये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 17, 2016 09:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close