S M L

काय महाग, काय स्वस्त ?

Sachin Salve | Updated On: Mar 18, 2016 10:42 PM IST

काय महाग, काय स्वस्त ?

maha_3budget_18 मार्च : "घने अंधेरो से था भरा हुवा घर जो मिला, कोई नही किया गिला शिकवा, किया तब जाके उजालो का समुंदर मिला " अशी शायराना अंदाजात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला दुसरा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्वसामन्यांना दैनदिन लागणार्‍या अनेक गोष्टींमध्ये वाढ करण्यात आलीये. वॅटमध्ये वाढ केल्यामुळे साहजिक सर्वच वस्तूंवर आता अर्धा टक्का कर द्यावा लागणार आहे. दुचाकी, तीन चाकी आणि चारचाकी वाहनं आता महागणार आहे. आता यापुढे दुचाकी आणि रिक्षासाठी ज्या 99 सीसीपर्यंत आहे त्यावर 8 टक्के कर द्यावा लागणार आहे.तर 100 सीसी, 125, 150, 160 आणि 200 सीसीपर्यंत वाहनांवर 9 टक्के अधिक कर द्यावा लागणार आहे. आणि 400 सीसीच्या वाहनांवर 10 टक्के कर द्यावा लागणार आहे. पेट्रोल, डिझेलवर अधिभार वाढवण्यात आलाय. तसंच खोबरेलावर 12.5 टक्के कर वाढवण्यात आलात. तर दुसरीकडे बेदाणे, मनुका, केक्स स्वस्त करण्यात आले आहे. एलईडी लाईट, बॅटरी, सौरऊर्जेवरील वाहने आणि शैक्षणिक साहित्य, अर्थात वह्या आणि पेन स्वस्त करण्यात आले आहे.

हे महागणार

- मार्बल आणि ग्रॅनाईट

- कार आणि बाईक

- पेट्रोल, डिझेल

- चहा

- खोबरेल तेल

- खरेदी करणं

- हॉटेलमध्ये खाणं आणि रहाणं

हे स्वस्त होणार

- बेदाणे, मनुका

- केक्स

- एलईडी लाईट

- शैक्षणिक साहित्य, अर्थात वह्या आणि पेन स्वस्त

- इंजेक्शन

- संरक्षण तार

- वापरलेली वाहने

- बॅटरी, सौरऊर्जेवरील वाहने

- स्तन कर्करोगासाठी वापरण्यात येणारी मॅमोग्राफी यंत्रणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 18, 2016 08:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close