S M L

'ज्या' कोठडीची परवानगी दिली त्याच कोठडीत भुजबळांचा मुक्काम !

Sachin Salve | Updated On: Mar 18, 2016 10:38 PM IST

'ज्या' कोठडीची परवानगी दिली त्याच कोठडीत भुजबळांचा मुक्काम !

सूरज ओझा, मुंबई - 18 मार्च : छगन भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर ज्या अतिसुरक्षित कोठडी बनावण्याची परवानगी दिली होती, आज त्याच कोठडी क्रमांक 12 मध्ये त्यांची रवानगी करण्यात आली आहे. कसं आहे हे बॅरेक नंबर 12? कोण आहे तिथे त्यांच्यासोबत? कसं आहे त्यांचं तुरुंगातलं आयुष्य ? याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट.

राष्ट्रवादीच्या घड्याळात 12 वाजले असले... तरी छगन भुजबळ आणि 12 या आकड्याचं जुनं नातं आहे. आघाडी सरकारमध्ये भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, तेव्हा मुंबईवर अतिरेक्यांनी हल्ला केला. त्यात पकलेल्या अजमल कसाब नावाच्या जिवंत अतिरेक्याला ठेवण्यासाठी एक नवी, अतिसुरक्षित कोठडी बनवण्याचे आदेश भुजबळांनी दिले होते. तेव्हा आर्थर रोड जेलमध्ये एक कोटी रुपये खर्च करून कोठडी नंबर 12 उभारण्यात आली. योगायोग असा की आता भ्रष्टाचार प्रकरणी अटक झाल्यानंतर.. भुजबळांना.. त्यांच्याच सहीने बांधलेल्या कोठडीत ठेवण्यात आलंय.

बरॅक नं 12

- भुजबळांचे नवे शेजारी

- शीना बोरा प्रकरणी आरोपी असलेले माध्यमसम्राट पीटर मुखर्जी

- अण्णाभाऊ साठे घोटाळ्यात आरोपी असलेले राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम

- लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी अबू जुंदल

- या बरॅकमध्ये दोन मजले आहेत आणि अनेक कोठड्या आहेत

- इथे 24 तास इंडो-तिबेटन बॉर्डर फोर्सची सुरक्षा असते

- हा बरॅक देशातल्या सगळ्यांत सुरक्षित बरॅक आहे

- पूर्वी इथेच संजय दत्तला ठेवलं होतं

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना ईडीने 14 मार्चला आर्थिक अफरातफर केल्या प्रकरणी अटक केली. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलीये. त्यांना ठरवून दिलेले अन्न देण्यात येतंय, असं तुरुंग प्रशासनाने म्हटलंय. घरचं जेवण मिळावं, यासाठी भुजबळांनी कोर्टात अर्ज केलाय. त्यांना छातीत दुखत असल्याचीही त्यांनी तक्रार केली होती. त्यासाठी जेजे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तुरुंगात जाऊन त्यांची तपासणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 18, 2016 10:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close