S M L

रशियामध्ये विमान कोसळलं, 62 जण मृत्युमुखी

Sachin Salve | Updated On: Mar 19, 2016 02:34 PM IST

रशियामध्ये विमान कोसळलं, 62 जण मृत्युमुखी

19 मार्च : रशियामध्ये एक प्रवासी  विमान कोसळल्याची घटना घडलीये. या अपघातात 62 जणांचा मृत्यू झाला. यात 4 लहान मुलांचा आणि 11 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

दुबईहून हे विमान रॉस्टॉव-ऑन-डॉनला जात होतं. हवामान खराब होतं. त्यामुळे विमानाला लँड होणं शक्य होत नव्हतं. कोसळण्याआधी पाटलटस्‌नं 2 तासांसाठी लँड करण्याचा प्रयत्न केला, पण दुदैर्वानं हे प्रयत्न यशस्वी झाले नाही. लँडिंगचा पहिले प्रयत्न केला, तो अयशस्वी झाला. दुसर्‍यांदा लँड होताना विमान कोसळलं. या अपघातात 55 प्रवासी आणि 7 क्रू मेंबर्सचा मृत्यू झालाय. यात 4 लहान मुलं आणि 11 परदेशी नागरिक होते.

फ्लायदुबई या एअरलाईन्सचं हे विमान होते. बोईंग कंपनीचं हे विमान फक्त 5 वर्षं जुनं होतं आणि कंपनीच्या विमानांपैकी सर्वात जुनं विमान होतं. ही कमी किमतीतील एअरलाईन होती. विमानाच्या देखभालीमध्ये काही त्रुटी राहिल्या का, की फक्त खराब हवामानामुळे हा अपघात झाला, हे आता चौकशीत पुढे येईल. बोईंग आणि फ्लायदुबई एअरलाईन्सने या अपघाताची चौकशी सुरू केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 19, 2016 12:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close