S M L

पतपेढ्यांचे ठेवीदार हवालदिल

15 मार्चअद्वैत मेहता, आशिष जाधवसहकारी पतपेढ्या बुडाल्याने हजारो ठेवीदारांचे हाल झाले. सरकारकडून कारवाई केल्याचा दावा केला जात आहे. पण अजूनही 70 हजार ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळालेल्या नाहीत. तर पतपेढ्या बुडवणारे बहुतेक संचालक राजकीय हितसंबंधामुळे नामानिराळेच आहेत.सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 462 सहकारी पतपेढ्या बुडाल्या. या पतपेढ्यांमध्ये 1350 कोटींच्या ठेवी होत्या. त्यापैकी 578 कोटी रुपयांच्या रकमेची वसुली करण्यात आली. अजूनही 700 कोटी रुपयांची रक्कम ठेवीदारांना परत करणे बाकी आहे.या प्रकरणी आजवर 427 पतपेढ्यांमधील 2 हजार 114 लोकांवर फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला. त्यापैकी 580 जणांना अटक करण्यात आली आहे. पण हा झाला सरकारी लेखाजोखा. प्रत्यक्षात बुडालेल्या पतपेढ्यांच्या ठेवींची रक्कम दीड हजार कोटींच्यावर आहे. त्यामुळे सरकारी आकडेवारीवर आणि सरकारवरही ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे विश्वास ठेवायला तयार नाहीत. पण सरकार मात्र आपलेच म्हणणे खरे असल्याचा आव आणत आहे.राज्यात सध्या 16 हजार 300 सहकारी पतपेढ्या सुरू आहेत. पण सरकारी नियंत्रण केवळ नावालाच आहे. बहुतेक पतपेढ्यांचा कारभार राजकारण्यांच्याच हाती असल्याने सामान्य ठेवीदारांकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2010 12:53 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2010 12:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close