S M L

श्रीहरी अणेंचं डोकं शरीरापासून वेगळं करा -नितेश राणे

Sachin Salve | Updated On: Mar 21, 2016 12:59 PM IST

श्रीहरी अणेंचं डोकं शरीरापासून वेगळं करा -नितेश राणे

21 मार्च : श्रीहरी अणेंचं डोकं शरीरापासून वेगळं करा, मग त्यांना कळेल महाराष्ट्राला तोडणे म्हणजे काय असतं असं वादग्रस्त ट्विट काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचं पूत्र नितेश राणे यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडालीये. त्यांच्या या ट्विटमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी रविवारी जालन्यामध्ये वादग्रस्त वक्तव्य केलंय. वेगळ्या विदर्भाला पाठिंबा दिल्यावर आता वेगळ्या मराठवाड्याचीही मागणी ही योग्य आहे असं मत अणे यांनी व्यक्त केलंय. मराठवाड्यावर विदर्भापेक्षा जास्त अन्याय झालाय असा दावाही अणेंनी केलाय. तसंच, दिल्लीवर दबाव आणल्याशिवाय मार्ग निघणार नाही असंही अणे म्हणाले. अणेंच्या या वक्तव्याचा काँग्रेसचे नेते नितेश राणे यांनी खरपूस समाचार घेतला. श्रीहरी अणेंचं डोकं शरीरापासून वेगळं करा, मग त्यांना कळेल महाराष्ट्राला तोडणे म्हणजे काय असतं असं ट्विट नितेश राणे यांनी केलंय. तर दुसरीकडे विधानसभेतही अणेंच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी अणेंना बडतर्फ करा अशी मागणी केलीये.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2016 12:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close