S M L

बँकेने काढले मंत्र्यांच्या नावाचे बील

15 मार्चसाहेब कोकणे, अहमदनगरसहकारी पतसंस्थांच्या बेधुंद कारभाराविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या संस्थांमधील संचालकांच्या मनमानी कारभारामुळे सामान्यांच्या ठेवी धोक्यात आल्या आहेत. पण सरकार त्यांना लगाम लावू शकलेले नाही. अशाच भन्नाट कारभाराचा नमुना आहे, अहमदनगरमधील नगर अर्बन कोऑपरेटीव्ह बँक. जिल्ह्यातील 80 हजार सदस्यांच्या जीवावर गेली 100 वर्षे ही बँक अधिराज्य करत आहे. गेल्या वर्षी 29 जून रोजी बँकेने एक हिशेब दिला. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासासाठी हॉटेलचे बील 27 हजार 67 रुपये. मंत्र्यांच्या गाडीसाठी 3 हजार रुपयांचे इंधन. तर 13 ऑगस्टला बँकेचे 1 लाख 94 हजार रुपये खर्च झाले, खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या एअर तिकीटावर.विशेष म्हणजे सहकार मंत्र्यांनी आपल्यासाठी बँकेने असा कोणताही खर्च केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत बँकेच्या संचालकांनाही माहीत नसते. तेही मग माहितीच्या अधिकाराचा आधार घेतात...आणि एवढा प्रकार झाल्यावरही भ्रष्ट्राचार आम्हाला खुलासा देण्याची गरज नाही, असे बँक म्हणते.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2010 03:02 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2010 03:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close