S M L

मृत्यूनंतरही 'त्या' दोघी जग पाहणार

Sachin Salve | Updated On: Mar 22, 2016 12:10 PM IST

मृत्यूनंतरही 'त्या' दोघी जग पाहणार

ठाणे -22 मार्च : घोडबंदर हिट अँड रन प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही जिवलग मैत्रिणींनी समाजाला एक आदर्श दिलाय. अचानकपणे या दोघींचा अपघाती मृत्यू झाल्यानंतरही सुरभी गोरे आणि आकांक्षा कांबळे यांच्या कुटुंबियांनी या दोघींचे डोळे दान केले आहेत.

खरंतर आपल्या मुलींच्या जाण्याचं दुःख या दोन्ही कुटुंबाना अजूनही पचवता येत नाहीये. पण ते बाजूला सारून गरजूंना दृष्टी देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलाय. वर्ल्ड टूर करण्याचं सुरभीचं स्वप्न होतं. ती तर आता नाही, पण तिचे डोळे हे स्वप्न पूर्ण करतील असं सुरभीच्या वडिलांनी म्हटलंय. तिचे स्वप्न तिचे डोळे पूर्ण करतील असा आत्मविश्वास गोरे कुटुंबियांना आहे. 6 मार्च रोजी घोडबंदर रोडवर एका कारने दोघींनी उडवलं होतं. यात दोघींचा मृत्यू झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 22, 2016 12:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close