S M L

बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये 3 बॉम्बस्फोट, 34 जण ठार, 170 जखमी

Samruddha Bhambure | Updated On: Mar 22, 2016 11:11 PM IST

बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये 3 बॉम्बस्फोट, 34 जण ठार, 170 जखमी

बेल्जियम - 22 मार्च :  बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समधल्या झवेंटेम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मेट्रो स्टेशन अशा दोन ठिकाणी आज (मंगळवारी) सकाळी 3 बॉम्बस्फोट झाले. या 3 बॉम्बस्फोटांमधल्या मृतांचा आकडा 28 वर पोहोचला असून 130 जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या स्फोटांची जबाबदारी आयसिसने स्वीकारली आहे.

ब्रुसेल्स इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि मेट्रो स्टेशनवर स्फोट झाले. या स्फोटांमधील एक स्फोट आत्मघातकी असल्याची शक्यता स्थानिक पोलिसांनी वर्तवली आहे. मेट्रो स्टेशन झालेल्या स्फोटात 15 जण तर विमानतळाच्या प्रस्थान कक्षात झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्तसंस्थांकडून सांगण्यात येत आहे. तर या हल्ल्यात 130 जण गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर ब्रुसेल्स विमानतळ खाली करण्यात आले. तसंच विमानतळाकडे जाणारी रेल्वे सेवाही बंद करण्यात आली आहे. दरम्यान, या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पॅरिस गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एक संशयित आरोपी, मोस्ट वॉन्टेड सालाह अब्दसलेम याच्या अटकेनंतर चारच दिवसांत हे स्फोट झाल्याने त्या कारवाईशी हल्ल्याचे धागेदोरे असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 22, 2016 07:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close