S M L

शिवसेना विदर्भाची माफी मागणार का? - श्रीहरी अणे

Samruddha Bhambure | Updated On: Mar 22, 2016 09:42 PM IST

शिवसेना विदर्भाची माफी मागणार का? - श्रीहरी अणे

मुंबई -22 मार्च : बाळासाहेब ठाकरे यांनी आश्वासन दिलं होतं की युती सरकारच्या काळात विदर्भाचा विकास झाला नाही, तर शिवसेनाच स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा देईल. विदर्भाचा विकास झाला नाहीये, त्यामुळे आता शिवसेनेने विदर्भाची माफी मागावी, अशी मागणी राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना केली. शिवसेनेच्या मागणीनुसार तुम्ही माफी मागाल का, या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं.

श्रीहरी अणेंनी राजीनामा दिला की त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. याचं कारण म्हणजे राजीनामा दिला नसता तर अविश्वास ठराव मांडला जाण्याची शक्यता होती, आणि दुसरीकडे अणेंना बडतर्फ केलं तर विदर्भवादी नाराज झाले असते. त्यामुळे मधला मार्ग म्हणून मुख्यमंत्र्यांनीच अणेंना राजीनामा देण्यास सांगण्यात, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र, राज्यपाल अथवा मुख्यमंत्री यापैकी कुणीही मला राजीनामा देण्यास सांगितलं नाही, असा खुलासा स्वत: श्रीहरी अणे यांनी IBN लोकमतशी बोलताना केला आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि डेक्कन असे तीन महाराष्ट्राचे भाग करावे असं डॉ. बाबासाहेबांनी सुचवले होते. त्याचाच मी जालन्याच्या सभेत उच्चार केल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर, स्वतंत्र विदर्भ किंवा मराठवाडा हे अशा राज्यांची निर्मिती मुख्यमंत्र्याच्या पातळीवर नाही तर केंद्रातूनच होऊ शकते. म्हणून स्वतंत्र मराठवाड्यासाठी, मराठवाड्याच्या जनतेला मोठा संघर्ष करावा लागेल, असं अणेंनी लिहिलेल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी निवेदन केल्यानंतरही विरोधकांनी प्रश्नांचा भडीमार सुरूच ठेवला. त्यानंतर हरीभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तरं सुरू ठेवायचा प्रयत्न केला. मात्र, विरोधक मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करायचा प्रयत्न करत होते. त्यामुळे मुख्यमंत्री संतापले आणि विरोधकांना या विषयाचं फक्त राजकारण करायचंय, असा आरोप त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 22, 2016 05:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close