S M L

डेव्हिड हेडलीची आजपासून उलटतपासणी

Sachin Salve | Updated On: Mar 23, 2016 09:04 AM IST

DavidColemanHeadleyमुंबई - 23 मार्च : 26/11 च्या मुंबई हल्ल्यातला मुख्य आरोपी डेव्हिड कोलमन हेडली याची आजपासून उलट तपासणी सुरू आहे. दहशतवादी अबु जुंदालचे वकील हेडलीची उलटतपासणी घेतील.

2008 मधल्या मुंबईवरच्या या दहशतवादी हल्ल्यातला हेडली हा प्रमुख सुत्रधार आहे. खरंतर फेब्रुवारीमध्ये झालेल्या चौकशी दरम्यान हेडलीनं अबु जुंदालचा आपल्या जबाबात काहीही उल्लेख केला नव्हता.

त्याउलट पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणेनं आयएसआयनं

लष्कर- ए-तोयबा, जमात-ए-मुस्लीम आणि हिझबुलसारख्या दहशतवादी संघटनांना आर्थिक आणि नैतिक आधार दिल्याचं म्हटलं होतं.

हेडलीनं इशरत जहाँ ही लष्कर ए तोयबाची सदस्य असल्याचंही म्हटलं होतं. हेडलीची उलट तपासणी चार दिवस चालेल, असं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 23, 2016 09:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close