S M L

आज दिवस रंगांचा..,दुष्काळाचं भान ठेवून #कोरडीहोळीखेळा

Sachin Salve | Updated On: Mar 24, 2016 09:54 AM IST

आज दिवस रंगांचा..,दुष्काळाचं भान ठेवून #कोरडीहोळीखेळा

24 मार्च : आज धुलिवंदन... देशभरात धुळवड साजरी होतेय. काल होलिका दहन झाल्यानंतर आज रंगांनी धुळवड खेळली जातेय. वाईट प्रवृत्तीचा नाश या होळीत केला जातो. खरंतर देशात अनेक राज्यात दुष्काळाचं सावट आहे. त्यामुळे पाण्यानं होळी खेळण्यापेक्षा कोरड्या रंगानं खेळण्याचं आवाहन करण्यात आलंय.

होळीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. अनेक ठिकाणी यंदा कोरडी होळी खेळण्यात येणार आहे. सरकारने रेन डान्सला बंदी घातली आहे. मुंबईसह अनेक शहरात सोसायट्यांमध्ये कोरडी होळी खेळण्याचं संकल्प करण्यात आला आहे. तर होळी साजरी करण्यासाठी बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत. विविधी रंग, पिचकार्‍यांनी स्टॉल्सने गजबजून गेल्या आहेत. यावेळी नैसर्गिक रंगाना ग्राहकांची पंसती आहे.

फुले उधळून आणि कोरडा रंग लावून साजरी करा होळी - मुख्यमंत्री

मुंबईत सर्वत्र धुलिवंदवनचा उत्साह दिसतोय. या वर्षी महाराष्ट्रात भीषण पाणी टंचाई आहे. त्यामुळे यावर्षीय धुलिवंदन फुले उधळून आणि कोरडा रंग लावून साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.त्यांच्या आवाहनाला सर्वच थरातून प्रतिसाद मिळत आहे असे दिसते. मुंबईत एक दिवस आधीपासूनच रंग खेळला जातो. या वर्षी मात्र एकदिवस आधी पासूनच रंग न खेळता फुलांची उधळण चेंबूरमध्ये करण्यात आली यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवाहन केले म्हणून भाजपचे पदाधिकारी याच अनुकरण करत आहेत आणि जनतेला पटवून देत आहेत.

खडकवासला धरणावर जमावबंदी

धुळवड आणि रंगपंचमीला पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या धरणात कुणीही रंग खेळून पाणी प्रदूषित करू नये यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयानं विशेष खबरदारी घेतलीये. खडकवासला धरणात सीआरपीसी कलम 144 लावण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. तसंच खडकवासला धरणाच्या पाण्यात कुणीही केमिकल युक्त रंग खेळू नये म्हणून पुणे महानगरपालिकेला फिरते भरारी पथक तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात. रंगपंचमीच्या दिवशी हे भरारी पथक खडकवासला धरणाच्या पाण्यावर करडी नजर ठेवून असणार आहेत. राज्यात दुष्काळाची भिषण परिस्तिथी असल्याने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 24, 2016 09:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close