S M L

तुम्ही भारताच्या विजयावर खुश नाहीत का ?, धोणी पत्रकारावर भडकला

Sachin Salve | Updated On: Mar 24, 2016 12:33 PM IST

तुम्ही भारताच्या विजयावर खुश नाहीत का ?, धोणी पत्रकारावर भडकला

24 मार्च : कॅप्टन 'कूल' नावाने ओळखला जाणार महेंद्रसिंग धोणी कधी नव्हे ते भडकला. बांगलादेशावर थरारक विजयानंतर पत्रकार परिषदेत धोणीचं रौद्ररुप पाहण्यास मिळालं. आणि तुम्ही भारताच्या विजयावर खुश नाहीत का ? असा सवालच धोणीने पत्रकारांना केला.

बांगलादेश विरुद्ध रोमहर्षक मॅचमध्ये भारताने एका रनने थरारक विजय मिळवला. त्यानंतर पत्रकार परिषदेत धोणींनी मीडियाशी संवाद साधला. एका पत्रकाराने, मॅचच्या आधी बांगलादेशला मोठ्या फरकाने हरवण्याची भाषा केली जात होती, काही खेळाडूंनी तर मोठ्या फरकाने हरवून रनरेट वाढवता येईल असा दावाच ठोकला. पण, टीम इंडिया कसाबसा 1 रनने विजय मिळवू शकली यावर तुम्ही समाधानी आहात का ? असा सवाल विचारला. यापुढे काही तो पत्रकार बोलणार यावर धोणी भडकला, भारताच्या विजय मिळाला यावर तुम्ही खूश नाहीत का ?, तुमच्या आवाजाचा 'टोन' पाहता तुम्ही भारताच्या विजयावर खूश नाहीत असं उत्तर धोणींनं दिलं. जर क्रिकेटचा प्रश्नच राहिला तर इथं काही स्क्रिप्ट नसते. तुम्हाला समजले पाहिजे, भारत टॉस हरला त्यानंतर टीम जास्त रन नाही बनवू शकली. जर तुम्ही फिल्डच्या बाहेर आहात आणि तुम्हाला ही गोष्ट नाही समजली तर तुम्हाला असा प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही अशा शब्दात धोणींने त्या पत्रकाराला सुनावले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 24, 2016 10:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close