S M L

सिंधुदुर्गत वेळेवर शर्ट न दिल्याने टेलरला ठोठावला 7 हजारांचा दंड

Samruddha Bhambure | Updated On: Mar 24, 2016 09:45 PM IST

सिंधुदुर्गत वेळेवर शर्ट न दिल्याने टेलरला ठोठावला 7 हजारांचा दंड

सिंधुदुर्ग - 24 मार्च :  वेळेला खुप किंमत असतो, हे वाक्य आपण कायम ऐकतो. पण वेळ न पाळल्याची किंमत सिंधुदुर्गात एका टेलरला भोगावी लागली आहे.

चंद्रशेखर देसाई या ग्राहकाने लग्नाच्या कार्यक्रमासाठी कणकवलीतल्या शाडोज टेलरकडे शर्ट शिवायला दिला होता. शाडोस टेलरने, शर्ट कधी मिळणार ह्याची मुदत देखील दिली होती. मात्र वेळेत शर्ट न देताच देसाई यांना उडवा-उडवीची उत्तर देण्यात आली. संतापलेल्या देसाई यांनी थेट जिल्हा ग्राहक मंचाकडे धाव घेतली. जिल्हा ग्राहक मंचाने देसाई यांच्या बाजूने निकाल देत, त्या शाडोस टेलरला 7 हजार रुपयांचा दंड आणि शर्ट वेळेत शीवून देण्याची शिक्षा सुनावली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 24, 2016 05:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close