S M L

'बेस्ट'ला धक्का, दीड लाख प्रवाशांनी फिरवली पाठ

Sachin Salve | Updated On: Mar 25, 2016 09:04 AM IST

 BEST-busesमुंबई - 25 मार्च : मुंबईतल्या प्रवाशांचं हक्काचं साधन मानल्या जाणार्‍या बेस्ट बसला मोठा तोटा झालाय. ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2015 या एका महिन्याच्या कालावधीत बेस्टचे दीड लाख प्रवासी घटल्याचे उघडकीला आलं आहे. पण सुट्टय़ांचा काळ असल्याने ही आकडेवारी घटल्याचं अधिकार्‍यांचं म्हणणं आहे.

काही वर्षांपूर्वी बेस्ट बसगाडय़ांनी दररोज प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या 40-45 लाखांवर होती. जून 2015 मध्ये प्रवाशांची संख्या 28.6 लाखांवर आली. जुलैमध्ये 30.5 लाख, ऑगस्टमध्ये 30.7 लाख, सप्टेंबर महिन्यात 29.9 लाख अशी झाली. मात्र, त्यानंतर एका महिन्यात हाच आकडा सुमारे दीड लाखांनी घटला. यामुळे आधीच तोटय़ात धावणार्‍या बेस्टची स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय वातानुकूलित बसच्या प्रवाशांची संख्या 76 हजारांवरून 8 हजारांवर पोहोचली आहे. 2015 या वर्षांत बेस्टची दोनदा झालेली भाडेवाढ, बसगाडय़ांची वाईट अवस्था आणि शेअर रिक्षा-टॅक्सीचालकांकडून बेस्टच्या तुलनेतलं कमी भाडे यामुळे बेस्टकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याचं दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2016 09:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close