S M L

एटीव्हीएम मशिन्सवरून तिकीटं एका क्लिकवर

Sachin Salve | Updated On: Mar 25, 2016 09:36 AM IST

एटीव्हीएम मशिन्सवरून तिकीटं एका क्लिकवर

मुंबई - 25 मार्च : मुंबईत उपनगरीय रेल्वेचं तिकीट एटीव्हीएम यंत्रावरुन प्रवाशांना एका क्लिकवर तिकीट काढता येण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी एटीव्हीएम मशीनवर हॉट की बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे सध्याच्या साध्या एटीव्हीएम यंत्राच्या तुलनेत ही नवीन यंत्रे जास्त सोपी ठरू शकतील.

रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी सर्वात सोपा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी हॉट की एटीव्हीएमम यंत्र उपलब्ध करण्याच्या पर्यायाचा काही दिवसांपासून विचार केला जात होता. पण रेल्वे माहिती प्रणाली केंद्र (क्रीस) या संस्थेनं यात उदासीनता दाखवल्यानं ही प्रणाली लालफितीत अडकली होती. सध्या मध्य रेल्वेवरील एकूण तिकीट विक्रीपैकी 65 टक्के विक्री ही तिकीट खिडक्यांवरून होते. तर एटीव्हीएम आणि जेटीबीएस प्रणालीवरून उर्वरित तिकीटे विकली जातात. या यंत्राद्वारे तिकीट काढण्याची प्रक्रिया सर्वसामान्यांनाही सोपी होऊ शकेल. यात प्रवाशांचा वेळही वाचेल. त्यामुळे या यंत्राची चाचणी सुरू केल्याची माहिती रेल्वे माहिती प्रणाली केंद्राचे मुंबईचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी सांगितलं. उपनगरीय रेल्वे मार्गावर असलेल्या तिकीटाचे टप्प्यांनुसार पाच,दहा आणि पंधरा या शुल्काची बटणे या एटीव्हीएमवर असतील असे सांगण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2016 09:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close