S M L

एक राज्य आणि दोन कायदे, सेनेचा भाजपवर हल्लाबोल

Sachin Salve | Updated On: Mar 25, 2016 12:00 PM IST

uddhav_on_cmमुंबई - 25 मार्च : फर्ग्युसन कॉलेजमधल्या गोंधळावरून शिवसेनेनं मुख्यमंत्री आणि सरकावर चांगलाच हल्ला केलाय. आपल्या मुखपत्र 'सामना'च्या आजच्या अग्रलेखातून एक राज्य आणि दोन कायदे असा डाव असल्याचा आरोप करण्यात आलाय. फर्ग्युसनमधल्या मारामारी करणार्‍यांना मोकळं रान मिळतं आणि नाशिकमध्ये शिवसेनेच्या महाराष्ट्र भक्तांना तुरुंगात डांबलं जातं, असा वेगळा कायदा का असा सवाल मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आलाय.

नाशिकमध्ये सेनेच्या कार्यक्रमात भाजपचा राडा आणि पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये झालेल्या वादावर आजच्या 'सामना'मधून भाजपवर टीका करण्यात आलीये. महाराष्ट्रातली शांतता आणि सुव्यवस्था नेमकं कोण बिघडवत आहे याचा काळजीपूर्वक तपास करणं आवश्यक आहे. शाहू, फुले, आंबेडकर, सावरकर यांची नावं सोयीसाठी घ्यायची आणि काम झालं की त्यांना अडगळीत टाकायचं असे लोक महाराष्ट्राची नासाडी करताना दिसतायेत, अशी टीका यात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उच्छादी आमदार जितेंद्र आव्हाड संधीचा फायदा घेण्यासाठी फर्ग्युसनला पोहोचले. तेव्हा भाजपच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. भाजपच्या युवा मोर्चाचे लोकही त्या हाणामारीत सामील झाल्याची तक्रार डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल झालीये. कन्हैयाकुमारवर देशद्रोहाचा गुन्हा आहे. त्याचे समर्थन करणार्‍यांनी जनाची नसली तरी मनाची लाज बाळगायला हवी. त्यामुळे आव्हाड यांच्याबाबतीत जे घडले तो एकप्रकारे संतापाचा उद्रेक असू शकतो, पण या राज्यात संतापण्याचा आणि हाणामारी करण्याचा अधिकार फक्त भाजपच्याच कार्यकर्त्यांना देण्यात आला आहे का ? असा सवालही विचारण्यात आलाय. फर्ग्युसन कॉलेज संपूर्ण देशाची ज्ञानाची गंगोत्री आहे. तिचं वातावरण गढूळ करू नका, असं आवाहनही करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2016 09:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close