S M L

ब्रसेल्स बॉम्बस्फोटांत जखमी निधी चाफेकर यांची प्रकृती स्थिर

Sachin Salve | Updated On: Mar 25, 2016 12:27 PM IST

ब्रसेल्स बॉम्बस्फोटांत जखमी निधी चाफेकर यांची प्रकृती स्थिर

25 मार्च : बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये बॉम्बस्फोटांत जेट एअरवेजची कर्मचारी निधी चाफेकर यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असून स्थिर आहे, असं समजतंय. त्या 15 टक्के भाजल्या होत्या, असं समजतंय. त्या कोमात आहेत असं पीटीआयनं म्हटलं होतं, पण त्याची पुष्टी स्वतंत्रपणे होऊ शकलेली नाही. ब्रसेल्सजवळच्या शारलोव्हामध्ये त्यांच्यावर उपचार होत आहे.

निधी चाफेकर या गेली 20 वर्षं जेटमध्ये कामाला आहेत. हल्ल्याच्या वेळी त्या ब्रसेल्स विमानतळातच होत्या. ब्रसेल्स हे जेट एअरवेजसाठी महत्त्वाचं शहर आहे. युरोप आणि अमेरिकेत जाणारी जेटची सर्व विमानं ब्रसेल्सला हॉल्ट घेतात.

दरम्यान, या स्फोटाप्रकरणी बेल्जियम पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. त्यांची नावं अजून उघड करण्यात आलेली नाहीत. ब्रसेल्सजवळच्या शॅरबीक भागातून त्यांना अटक करण्यात आली आहे. बेल्जियम सरकारनं मोठ्या प्रमाणावर तपास मोहीम हाती घेतलीये. यात त्यांना इतर युरोपीय देश आणि अमेरिकेचीही मदत मिळतेय. या देशांच्या गुप्तचर विभागांमध्येही मोठ्या प्रमाणावर माहितीची देवाणघेवाण सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2016 11:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close