S M L

भुजबळांच्या मालमत्तेच्या पाहणीसाठी ईडीचं पथक नाशिकमध्ये

Sachin Salve | Updated On: Mar 25, 2016 01:33 PM IST

भुजबळांच्या मालमत्तेच्या पाहणीसाठी ईडीचं पथक नाशिकमध्ये

नाशिक - 25 मार्च : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याभोवत 'ईडी' फास आणखी आवळण्याची तयारीत आहे. चार जणांचं ईडीचं पथक नाशिकमध्ये दाखल झालं असून भुजबळांच्या सर्व मालमत्तेची पाहणी करणार आहे. भुजबळांच्या मालमत्तेवर टाच आणली जाणार का ? याबद्दलचा सस्पेन्स अजून गुलदस्त्यात आहे. भाजपचे खासदार किरीट सोमय्या सुद्धा नाशिकमध्ये आहेत. पण, त्यांना भुजबळांच्या फार्महाऊसवर जाण्यापासून रोखण्यात आलंय.

मनी लाँड्रिंग आणि महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सद्या ऑर्थर रोड जेलमध्ये मुक्कामी आहे. ईडीकडून त्यांची चौकशी सुरू आहे. आज (शुक्रवारी) ईडीची चार जणांची एक टीम नाशिकमध्ये दाखल झालीये. मात्र, ईडी नाशिकमध्ये नक्की भुजबळांच्या मालमत्तेवर टाच आणणार की केवळ नोटीस बजावणार ते अजून स्पष्ट नाही.

भुजबळांच्या मालमत्तेचा तपशील ईडीने कोर्टात सादर केला होता. त्या सर्व मालमत्तेच स्पॉट इन्सपेक्शन करण्यासाठी ईडीची टीम आली असण्याची शक्यता आहे. याआधी गिरणा सहकारी कारखान्याची मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे जप्तीची नोटीस देण्यासाठी ईडीची टिम कारवाई करणाची शक्यता आहे.

मात्र, अद्याप ईडीने कुठलाही खुलासा केलेला नाही. दुसरीकडे, किरीट सोमय्या आज नासिक इथल्या भुजबळांच्या बंगल्याला भेट देणार आहेत. या प्रसंगी किरीट सोमय्या यांनी दावा केला आहे की, अशोका बिल्डकोनच्या खर्चाने भुजबळांचा बंगला बांधून दिला आहे. टोल कंत्राटाच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. भुजबळांनी लोकांची लूट करून हा पैसा जमा केला असून कटारिया यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करणार असल्याचंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.

भुजबळांची नाशिकमधली मालमत्ता

भुजबळ पॅलेस : 100 कोटी रु.

चंद्राई बंगला : 4 कोटी रु.

राम बंगला : 50 लाख रु.

येवला कार्यालय, बंगला : 1.50 कोटी रु.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2016 01:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close