S M L

संमेलनाचे इंटरनेटवरून थेट प्रक्षेपण

18 मार्चपुण्यात होणारे 83 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हायटेक होणार आहे.हे संमेलन सगळ्या रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इंटरनेटचा वापर करून संमेलनाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तसेच हे संमेलन आता कॉम्प्युटरसोबतच मोबाईलवरही बघता येणार आहे. राज्यातील अमरावती, अकोला, औरंगाबाद, धुळे, नांदेड, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, आणि रत्नागिरी या शहरांमध्ये वेबकास्टिंग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट प्रक्षेपणही होणार आहे. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्या त्या शहरातील तज्ज्ञ, साहित्यिक या संमेलनातील परिसंवाद किंवा चर्चांमध्ये सहभागी होऊ शकतील. 26 ते 28 मार्च दरम्यान www.mkcl.org/mss या वेबसाईटवरून संमेलनात सहभागी होता येणार आहे. महाराष्ट्र नॉलेज कार्पेरेशन लिमिटेड म्हणजेच MKCL या कंपनीकडून ही सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. त्यासाठी कंपनीला दीड कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 18, 2010 12:28 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 18, 2010 12:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close