S M L

मुंबईकरांवर आणखी पाणीकपातीची टांगती तलवार

Samruddha Bhambure | Updated On: Mar 25, 2016 10:04 PM IST

 मुंबईकरांवर आणखी पाणीकपातीची टांगती तलवार

उदय जाधव, प्रणाली कापसे, मुंबई

- 25 मार्च :  होळीच्या सणाला मुंबईकरांनी कोरडी होळी खेळून चांगलीच पाणी बचत केली. पण हीच पाणी बचत त्यांना आणखी काही काळ करावी लागणार आहे. आत्तापर्यंत ज्यांना पाणी टंचाईची झळ पोहचली नाही. त्यांना ही ती पोहचण्याची शक्यता आहे. कारण बीएमसीनं आखलेलं पाण्याचं वेळापत्रक बिघडवणारा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे, मिरा- भाईंदर, कल्याण, उल्हासनगर या सर्व भागांच्या पाणी दुर्भिक्षाला पाहून राज्य सरकारला साकडं घातलं होतं, आणि जल संपदा खात्यानं ते मान्यही केलं. परिणामी राज्य सरकारच्या भातसा धरणातून ठाणे महानगर पालिका आता 50 एमएलडी पाणी जास्त घेणार आहे. याच धरणातून बीएमसी सुद्धा सर्वात जास्त पाण्याचा उपसा करते. म्हणून या वाढीव उपश्यामुळे मुंबईचं पाण्याचं गणित बिघडणार आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या 7 धरणामध्ये सध्या एकूण 4 लक्ष 73 हजार एमएलडी पाणी साठा आहे. हा साठा गेल्यावर्षीच्या तुलनेत 1 लाख एमएलडीनं कमी आहे. 7 धरणापैकी सर्वात जास्त पाणी साठा भातसा धरणात आहे. भातसाचा साठा बीएमसीच्या एकूण साठ्याच्या निम्मा म्हणजे 2 लाख 16 हजार एमएलडी आहे. याच धरणातून आता दररोज 50 एमएलडी जास्त पाणी उपसलं जाणार आहे. म्हणजे या धरणाचा साठा बीएमसीनं आखलेल्या अंदाजापेक्षा वेगात कमी होणार आहे. म्हणजे मुंबईची ज्या धरणावर भिस्त आहे. तोच पाणीसाठा आधी संपणार आहे.

भातसा हे राज्य सरकारचं धरण असल्यानं त्यात कुणाला किती साठा द्यावा हा निर्णय राज्य सरकार घेतं. पण ज्या महानगर पालिका याच धरणावर आधारभूत पाण्याचं गणित मांडतात, त्यांना किमान या निर्णयाबाबत माहिती देणं अपेक्षित होतं. पण बीएमसी अधिकार्‍यांना मात्र याची पुसटशी कल्पना सुद्धा नाहीये. त्यामुळे येत्या काळात मुंबईतही पाणी पेटण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2016 09:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close