S M L

अभिभाषणाची सुरुवात मराठीतून

18 मार्चआज सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपाल के. शंकर नारायणन यांच्या अभिभाषणाने झाली. विशेष म्हणजे राज्यपालांनी आपल्या अभिभाषणाची सुरूवात आणि शेवट मराठीतून केला. काही दिवसांपूर्वी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना तशी विनंती केली होती.राज्यपालांनी आपल्या भाषणात राज्य सरकारच्या योजना आणि काही महत्वाच्या निर्णयांचा ऊहापोह केला. त्यामध्ये राज्य झोपडपट्टी मुक्त करण्याचा निर्धारही राज्य सरकारच्या वतीने करण्यात आला. राज्यपालांच्या अभिभाषणातले काही महत्वाचे मुद्दे असे आहेत- दारिद्र्य रेषेखालील एकही कुटुंब घरापासून वंचित राहू नये यासाठी येत्या 3 वर्षांत साडेसात लाख घरे बांधणारआतापर्यंत 1 लाख 14 हजार 550 झोपडीधारकांना घरे पुरवणारे 612 एसआरए प्रकल्प पूर्णयेत्या 1 मे ला महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण जाहीर करणारबँकांमार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दरवर्षी 1700 कोटींची मदत देणार दुष्काळी परिस्थितीमुळे 2009- 2010 या वर्षात पीक कर्जाची वसुली थांबवलीप्रत्येक तालुक्यात जवळपास 200 शेततळी बांधणारआगामी वर्षात 129 विशाल पाणलोट क्षेत्रे विकसित करणाररोजगार हमी योजनेची मजुरी 66 रुपयांवरून 100 रुपयांवर नेणार मोनोरेलचे बहुतांशी काम मे 2011 पर्यंत पूर्ण करणार

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 18, 2010 01:23 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 18, 2010 01:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close