S M L

दुष्काळ मुक्याजिवांच्या जीवावर, पाण्याअभावी 5 कोल्हांचा अंत

Sachin Salve | Updated On: Mar 27, 2016 02:23 PM IST

दुष्काळ मुक्याजिवांच्या जीवावर, पाण्याअभावी 5 कोल्हांचा अंत

बीड - 27 मार्च : सध्या राज्यात सर्वत्र पाणीटंचाईचं भीषण संकट निर्माण झालंय आणि आता हेच पाणीसंकट वन्य जीवांच्याही जीवावर उठलंय. पाण्याच्या शोधात अनेक वन्य प्राणी विहिरीत पडून जखमी होत आहेत तर काही प्राण्यांचा जीव जातोय. बीड जिल्ह्यातल्या शिरुर गावात 5 कोल्ह्यांचे सांगाडे सापडले आहेत. पाण्याच्या शोधात असताना या कोल्ह्यांचा जीव गेल्याचा प्राणीमित्रांचा संशय आहे. तर एक काळवीट पाण्याच्या शोधात असताना विहिरीत पडलं होतं. तब्बल 36 तासांच्या प्रयत्नानंतर या काळविटाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात प्राणीमित्रांना यश आलंय.

दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता ही वाढत असून आता याची झळ वन्य जीवांना बसत आहे. पाण्यासाठी दाहिदिशा फिरणारी माणसे आपण पाहिलात मात्र वन्यजीवांची होणारी घालमेल अद्याप कोणाला दिसली नाहीये, हे दृश्य पहा यातून बीड जिल्ह्यातल्या दुष्काळाची दाहकता नक्कीच समोर येईल. एक काळवीट पाण्याच्या शोधात आले, या काळविटाला पाणी दिसले मात्र आपल्या जिवाची पर्वा न करता पाणी पिण्यासाठी प्रयत्न करणारे हे वन्यजीव या विहिरीत पडले तब्बल 36 तासांनंतर प्राणीमित्राने या वन्यजीवाला सुखरूप बाहेर काढत त्याला जीवनदान दिले मात्र, हा जीवघेणा संघर्ष एवढ्यावरच थांबत नाहीये. मृत असलेली ही चार कोल्हे... अन्न आणि पाण्याच्या शोधात यांना जिव गमवावा लागलाय. सध्या भीषण दुष्काळ त्यातच उन्हाचा पारा 40 अंशावर पोहचलाय. डोंगर कपारीत राहणारी ही कोल्ही पाण्याविना उन्हाचा तडाका सहन न झाल्याने मृत्युमुखी पडल्याचे प्राणी मित्र आणि डॉक्टर सांगतायेत.

गेल्या चार वर्षांपासून बीड जिल्हा दुष्काळात होरपळतोय. दरवर्षी अनेक उपाययोजना केल्या जातात, मात्र या वन्यजीवांना वाचविण्यासाठी सरकार आणि वन विभागाकडून अद्याप उपाययोजना करण्यात आले नाही हे विशेष म्हणावे लागेल. दुष्काळ पाहणी दौर्‍यात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे स्वत: आले होते. गुरांच्या छावण्याची खबरबात घेवून ते थेट निघून गेले मात्र वन्य जीवांविषयी मंत्री महोदयांनी साधे ब्र ही काढले नाही. गुरांच्या छावण्यात पैसा मिळतो वन्यजीवांच्या उपायोजनात काहीच मिळत नसल्याने सरकारचे कल चारा छावण्याकडे असल्याचा आरोप प्राणी मित्रांनी केलाय. शाकाहारी वन्य जीवांसाठी प्राणी मित्र त्यांच्या स्तरावर मदत करतायत मात्र मांसाहारी वन्य जीवांच्या खाद्याचे काय करायचे हां मोठा प्रश्न प्राणी मित्रांसमोर उभा आहे. संबंधित वन विभागाच्या अनास्थेमुळेच वन्य जीवांचा मृत्यू झाला असून वन्यजीवांच्या मृत्यूला सरकारच जबाबदार असल्याची खंत प्राणी मित्रांनी यावेळी बोलून दाखवलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 27, 2016 02:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close