S M L

देवनार कचरा डेपोत पुन्हा आग

Sachin Salve | Updated On: Mar 27, 2016 04:48 PM IST

देवनार कचरा डेपोत पुन्हा आग

मुंबई - 27 मार्च : देवनार डंपिंग ग्राऊंडमध्ये पुन्हा आग लागली आहे. शनिवारी रात्री 11च्या सुमाराला आग लागल्याचं समजतंय.

अग्निशमन दलाचे जवान तिथे तातडीने पोहोचले. आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे पण आग अजूनही सुरू आहे.

गेले अनेक दिवस देवनारच्या डंपिंग ग्राऊंडमध्ये वारंवार आग लागतीये. एवढंच नाही, तर एकाच वेळी अनेक ठिकाणी आग लागतेय. इथले रहिवासी तर हवालदिल झाले आहेत. आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होणं, सतत खोकला असणं, दम्याचे रुग्ण आणि लहान मुलांना त्रास होणं, अशा अनेक समस्यांना ते सामोरे जातायेत. आग लागण्याची या महिन्यातली ही दुसरी घटना आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 27, 2016 04:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close